ईश्वरपूर (जिल्हा सांगली) पोलिसांकडून १६ लाखांच्या कोकेनसह नायजेरियन नागरीक अटकेत !
ईश्वरपूर (जिल्हा सांगली), ३० डिसेंबर (वार्ता.) – पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर एका खासगी बसमधून एक संशयित व्यक्ती कोकेन घेऊन जात असल्याची माहिती ईश्वरपूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी २६ डिसेंबरच्या रात्री सापळा लावून १६ लाख रुपयांच्या कोकेनसह एडवर्ड जोसेफ इदेह (वय ३५ वर्षे) या नायजेरियन नागरिकाला अटक केली. त्याला न्यायालयाने १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.