देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री. शेखर इचलकरंजीकर यांनी श्रीकृष्णाच्या चित्राला वाहिलेले कमळपुष्प २५ घंटे टवटवीत रहाणे
६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री. शेखर इचलकरंजीकर यांनी श्रीकृष्णाच्या चित्राला वाहिलेले कमळपुष्प २५ घंटे टवटवीत रहाणे
‘४.९.२०१९ या दिवशी सकाळी ८ वाजता मी भगवान श्रीकृष्णाच्या सनातन-निर्मित चित्राला कमळाचे फूल वाहिले. ते फूल ५.९.२०१९ या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत टवटवीत होते.’
– श्री. शेखर इचलकरंजीकर (वय ७३ वर्षे), देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. (१६.९.२०१९)
‘सामान्यतः पाण्यातील कमळाचे फूल २४ घंटे टवटवीत रहाते ! या ठिकाणी साधकाने देवतेला वाहिलेले फूल २५ घंटे टवटवीत राहिले, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे ! देवतेला वहाण्यापूर्वीही ते फूल पाण्यातून काढून काही काळ निश्चितच झाला असेल ! साधकांच्या भक्तीभावाला देव कशा प्रकारे प्रतिसाद देतो, याचे हे उदाहरण आहे !’
– डॉ. अजय जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१२.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |