हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यांत जनजागृती मोहीम !

३१ डिसेंबरच्या रात्री होणारे गैरप्रकार रोखण्याविषयी मोहीम

विविध शाळा आणि महाविद्यालये येथे विद्यार्थ्यांचे प्रबोधन

सोलापूर, २९ डिसेंबर (वार्ता.) – ख्रिस्ती नववर्षारंभाच्या नावाखाली ३१ डिसेंबर हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या कालावधीत होणारे गैरप्रकार रोखावेत यासाठी सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यांत पोलीस आणि प्रशासन यांना निवेदने देण्यात आली; तर ३१ डिसेंबरच्या रात्री स्वैराचार आणि व्यसनाधीनता वाढून युवा शक्तीचे खच्चीकरण होत आहे. या स्थितीतून युवकांना बाहेर काढण्याचे सामाजिक कर्तव्य शाळा-महाविद्यालयांचेही आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे विविध माध्यमांतून प्रबोधन करावे, विद्यार्थ्यांना या माध्यमातून होणारी हानी समजावून सांगावी या मागण्यांचे निवेदन १८० हून अधिक शाळा-महाविद्यालये येथे देण्यात आले. या उपक्रमामध्ये समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या धर्मशिक्षणवर्गातील, तसेच साधना सत्संगातील राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन जनजागृती केली. या उपक्रमाला शाळा आणि महाविद्यालये यांचाही मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद लाभला. या मोहिमेअंतर्गत समितीच्या कार्यकर्त्यांनी शाळा-महाविद्यालये येथे विद्यार्थ्यांना विषय सांगून जनजागृती केली, तर काही ठिकाणी फलकप्रसिद्धीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

सोलापूर येथे प्रशासकीय अधिकारी आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये निवेदन !

मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले (डावीकडे)यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

सोलापूर येथील महसूल उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले आणि तहसीलदार दत्तात्रय मोहोळ यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सोलापूर येथील अविनाश मदनावाले, ओम जगताप, अभिषेक नागराळे, देवीदास वडलाकोंडा, शिंगरय्या मेर्गू, नागेश नारायणकर, शशांक बोलाबत्तीन, सागर कोडम, लिंगराज हुळ्ळे, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री देशमुख, सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी आदी उपस्थित होते.

मुख्याध्यापक श्रीराम सर (उजवीकडे) यांना निवेदन देतांना श्री. ओंकार बाबर
प्राचार्य विद्यानंद स्वामी आणि मुख्याध्यापक नितीन कुलकर्णी यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी नरेश गणुरे

सोलापूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलचे मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले सर, कुचन प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीराम सर, केंगणाळकर महाविद्यालय सोलापूर येथील प्राचार्य विद्यानंद स्वामी आणि कै.रा. थोबडे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नितीन कुलकर्णी यांनी निवेदन स्वीकारले, तसेच येथील कोठारी शाळा, कुचन कनिष्ठ महाविद्यालय, ए.आर्. बुरला महाविद्यालय, बंडा प्रशाला, महात्मा विद्यामंदिर प्रशाला यांसह अनेक शाळा आणि महाविद्यालयांत समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री कृष्णहरी क्यातम, नरेश गणुरे, ओंकार बाबर यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

मंगळवेढा येथील नायब तहसीलदार पी.ए. राठोड यांना निवेदन देतांना माजी उपनगराध्यक्ष श्री. सुरेश जोशी (उजवीकडे)आणि श्री. नागेश कस्तुरे (डावीकडे)

मंगळवेढा – येथील प्रभारी नायब तहसीलदार पी.ए. राठोड, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यासह संत दामाजी हायस्कूल आणि महाविद्यालय, महाराणी ताराबाई हायस्कूलचे मुख्याध्यापक यांना निवेदन देण्यात आले. या वेळी माजी उपनगराध्यक्ष श्री. सुरेश जोशी, श्री. नागेश कस्तुरे, सौ. संगिता मर्दा, सौ. वैशाली वठारे आदी उपस्थित होते. या मोहिमेच्याद्वारे शहरात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी माजी नगराध्यक्ष श्री. सुरेश जोशी यांनी पुढाकार घेतला.

अकलूज – येथील अकलाई विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील ओवळी, मॉडेल विधांगी प्रशालेचे मुख्याध्यापक गिरीश ढोरे, ‘गुलमोहर इंग्लिश मिडियम ज्युनिअर कॉलेज’ यांसह विविध शाळेच्या मुख्याध्यापकांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीच्या सौ. देविका लखेरी आणि सौ. विद्या रणसिंग आदी उपस्थित होत्या.

पंढरपूर – येथील पोलीस निरीक्षक अनील पवार आणि प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी पेशवा युवा मंचचे श्री. गणेश लंके, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री ओंकार कुलकर्णी, राजेंद्र माळी, शशीशेखर पाटील आदी उपस्थित होते.

साखरवाडी – येथील सरदार वल्लभभाई हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक नाळे सर यांना निवेदन दिले. या वेळी प्रा. नाळे यांनी शिक्षकांना बोलावून ‘प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांना विषय सांगा’, असे सांगितले, तसेच ‘प्रत्येक वर्गामध्येही निवेदन वाचून दाखवून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करा’, असे सांगितले. या वेळी सर्वश्री विकास तांबे, प्रवीण आडसूळ, तात्यासो खरात, विलास मोहिते, किरण पिसाळ, दौलत तांबे आणि मोहिते सर आदी राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिक उपस्थित होते.

सोलापूर येथील सैनिक स्कूल येथे विद्यार्थ्यांचे प्रबोधन करतांना कु. वर्षा जेवळे

सोलापूर शहर – सोलापूर शहरातील नेहरूनगर येथील सैनिक संकुल येथे समितीच्या कु. वर्षा जेवळे यांनी विद्यार्थ्यांसमोर विषय मांडला, तर श्राविका शाळेत सौ. अंजली बंडेवार यांनी १२० विद्यार्थ्यांना विषय सांगून प्रबोधन केले. सेवासदन येथील शिक्षकांनाही समितीच्या सौ. राजश्री देशमुख यांनी विषय सांगून प्रबोधन केले आणि हिंदु धर्माचे महत्त्व सांगितले.

मराठवाड्यातील जिल्हे आणि अन्य जिल्ह्यांत जनजागृती !

बारामती येथील ‘क्रीएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल’ आणि ज्युनिअर कॉलेज येथे विद्यार्थ्यांना विषय सांगतांना श्री. चंद्रकांत दीक्षित

बारामती (जिल्हा पुणे) – येथील हिंदु जनजागृती समितीचे श्री. चंद्रकांत दीक्षित यांनी धोंडीबा आबा सातव विद्यालय येथे मुख्याध्यापकांना निवेदन दिले, तसेच या शाळेतील ७ वर्गांमध्ये ‘३१ डिसेंबर साजरा का करू नये’, याविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. येथील ‘क्रीएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज’ येथेही श्री. दीक्षित यांनी निवेदन दिले. या शाळेतील ८ वी आणि ९ वीच्या विध्यार्थ्यांना नववर्ष १ जानेवारीला नसून गुढीपाडव्याला साजरे करण्याचे महत्त्व सांगण्यात आले.

लातूर

लातूर – येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले, तसेच श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ लातूरद्वारा संचलित श्री शिवाजी प्राथमिक विद्यालयालाही निवेदन दिले. हे निवेदन महाविद्यालयाच्या लिपिक आर्,आर्. जाधव यांनी स्वीकारले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. गणेश पाटील आणि श्री. बालाजी बनसोडे आदी उपस्थित होते.

धाराशिव

धाराशिव – येथील निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री नीलेश गोरे, मनोज काकडे, अमित कदम, संतोष पिंपळे, भगवान श्रीनामे, बाळासाहेब गोरे, श्रीकृष्ण धर्माधिकारी आदी उपस्थित होते. येथील नूतन शाळा आणि भोसले हायस्कूल येथील मुख्याध्यापकांना निवेदन देण्यात आले. या वेळी सौ. साधना लेणेकर, सौ. कमल खडबडे आणि सौ. लक्ष्मी पिंपळे आदी महिला उपस्थित होत्या.

नांदेड

सोलापूर, लातूर, बार्‍हाळी (जिल्हा नांदेड), गेवराई (जिल्हा बीड) येथे अशा प्रकारे फलकाद्वारे जनजागृती करण्यात आली

बार्‍हाळी – येथील काही शाळांमध्य निवेदन देण्यात आले, तसेच दुकाने, शहरातील विविध मंदिरे, कार्यालये यांठिकाणी ‘माझे नवीन वर्ष हिंदु संस्कृतीनुसार चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याला आहे’ असा मजकूर असलेले पत्रक लावून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली.

सातारा

फलटण – येथील निवासी नायब तहसीलदार आणि कार्यकारी दंडाधिकारी डॉ. डी.एस्. बोबडे यांना निवेदन दिले. या वेळी समितीचे श्री. उदय ओझर्डे, श्री. संदीप काशिद, सौ. सिंधु कुंभार, सौ. देशपांडे, श्रीमती डोईफोडे उपस्थित होते.

बीड

बीड – येथील सरस्वती माध्यमिक विद्यालय, यशवंत विद्यालय, डॉ. भिमराव पिंगळे विद्यालय, विवेकानंद विद्यामंदिर, चंपावती विद्यालय, भगवान विद्यालय यांसह अन्य शाळांमध्येही निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. शेषेराव सुसकर आणि श्री. भास्कर हुंबे आदी उपस्थित होते.

रिक्शांवर फलक लावून प्रसार

गेवराई (जिल्हा बीड)  येथील धर्मप्रेमी श्री. शाम गायकवाड यांनी ‘माझे नवीन वर्ष हिंदु संस्कृतीनुसार चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याला आहे’ असा मजकूर असलेले पत्रक रिक्शांवर लावले. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली.

अंबाजोगाई

अंबाजोगाई – येथील डी. फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे ३१ डिसेंबरविषयी प्रबोधन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुनीता पंचाक्षरी यांनी विद्यार्थ्यांना हिंदु संस्कृतीचे महत्त्व सांगितले. या वेळी ६० विद्यार्थी उपस्थित होते.

अंबाजोगाई तालुक्यातील नागझरी येथील ‘सरस्वती पब्लिक स्कूल’चे मुख्याध्यापक संगप्पा सर, तर अंबाजोगाई येथील श्री यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. तांदुळजेकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सौ. सुनीता पंचाक्षरी आणि सौ. योगिता केंद्रे या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.