केरळ येथील सौ. स्मिता सिजू यांनी मानसरित्या सनातनच्या तीन गुरूंची आरती केल्यावर भावजागृती होऊन श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी खांद्यावर हात ठेवल्याचे जाणवणे
‘२४.१.२०२१ या दिवशी मी सकाळी ७ वाजता तीन गुरूंची (परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) यांची आरती करत होते. त्या वेळी ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप चालू करून मी आरती ऐकत होते. मी त्यांना मानसरित्या दिव्याने आणि नंतर उदबत्तीने ओवळतांना माझ्या हातावर रोमांच आले. मला हातापासून हृदयापर्यंत संवेदना जाणवून माझा भाव जागृत झाला. त्या वेळी मला जाणवले, ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी निळ्या रंगाचा पोशाख घातला असून त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आहे.’ तेव्हा माझी भावजागृती होऊन मला शांत वाटले. नंतर मला सहस्रार चक्रापर्यंत संवेदना जाणवल्या. माझे भावाश्रू थांबत नव्हते.
मी कधी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात गेले नाही, तसेच मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि गुरुदेव यांना प्रत्यक्ष पाहिलेले नाही, तरीही मला ही अनुभूती दिल्याबद्दल मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. स्मिता सिजू, केरळ
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |