ठाणे, महाराष्ट्र येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रदीप चिटणीस यांनी शास्त्रीय संगीत गातांना उपिस्थत साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती
ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग
‘२३ ते २५.११.२०२१ या कालावधीत ठाणे, महाराष्ट्र येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे गायक श्री. प्रदीप चिटणीस यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत सादर केले. (श्री. प्रदीप चिटणीस यांनी शास्त्रीय संगीतात ‘अलंकार’ पदवी प्राप्त केली आहे.) हे शास्त्रीय संगीत ऐकतांना उपस्थित असलेल्या काही साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. राग देसमल्हार
१ अ. कु. मयुरी आगावणे
१ अ १. त्रासदायक अनुभूती
अ. ‘श्री. चिटणीसकाका ‘देसमल्हार’ हा राग गात असतांना माझ्या शरिराच्या डाव्या बाजूला ‘डोके, हात आणि पाय यांचे तळवे’ यांवर मुंग्या आल्या. त्यामुळे माझी अस्वस्थता वाढली. काही वेळाने मुंग्या येण्याचे प्रमाण न्यून झाले.’
१ अ २. चांगली अनुभूती
अ. ‘मला आनंद जाणवून आरंभी माझ्या विशुद्धचक्रावर २० मिनिटे कंपने जाणवली. नंतर मला अनाहतचक्र ते स्वाधिष्ठानचक्र यांतील भागावर १५ मिनिटे संवेदना जाणवल्या.’
१ आ. श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
१. ‘हा राग ऐकतांना आरंभी माझी बहिर्मुखता होती. त्यानंतर मी पूर्णतः श्री. चिटणीस यांच्या गायनाशी एकरूप झालो.
२. श्री. चिटणीसकाका गायनात अतिशय मग्न असल्याचे मला जाणवले.’
२. राग गोरखकल्याण
२ अ. कु. म्रिणालिनी देवघरे
१. ‘गोरखकल्याण’ हा राग प्रयोगासाठी असणार आहे’, असे समजल्यावर एक क्षण माझ्या डोळ्यांसमोर ‘शेषनाग’ आला. प्रत्यक्ष गायन चालू असतांना एक क्षण ‘सर्प माझ्या आत गुंडाळला आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले.
(‘या रागाची स्वरसंगती वक्र असल्यामुळे या रागाचे नागमोडी सर्पाशी साधर्म्य असते.’ – संकलक)
२. रागाचे ‘नी, सा, रे, म, रे, नी, ध’ हे स्वर ऐकतांना मला वातावरणात प्रकाश पोकळी दिसून ‘या रागात आकाशतत्त्व आहे’, असे जाणवले. त्या वेळी माझे ध्यान लागले.
३. ‘हा राग आज्ञाचक्र आणि सहस्रारचक्र यांच्याशी संबंधित आहे’, असे मला जाणवले. या रागाच्या ताना आणि बंदिश (टीप) यांच्या गतीप्रमाणे माझे शरीर आतून हलत असल्याचे जाणवले.
(‘प्रत्यक्षात या रागाची स्पंदने आज्ञाचक्र आणि अनाहतचक्र या चक्रांवर जाणवतात.’ – संकलक)
टीप – ताना : द्रुत (जलद) गतीत केलेला स्वरविस्तार.
बंदिश : शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत. यालाच ‘छोटा ख्याल’ किंवा ‘चीज’, असेही म्हणतात. ही मध्यलय किंवा द्रुत लयीत गातात. |
४. राग ऐकतांना मला आनंद आणि शांती यांची स्पंदने जाणवली.
५. मला श्रीकृष्णाचे स्मरण होत होते.
६. ‘गोरखकल्याण’ या नावाचा सुचलेला भावार्थ : ‘गोरख’ म्हणजे गोमातेचे रक्षण करणारा आणि सर्वांचे कल्याण करणारा.’
३. राग यमन
३ अ. कु. म्रिणालिनी देवघरे
१. ‘राग चालू झाल्यावर माझे ध्यान लागले. मला ध्यानातून बाहेर येता येत नव्हते. स्वरांप्रमाणे मला माझे शरीर हळू आणि जलद गतीने हलत असल्याचे जाणवले.
२. ‘श्री. चिटणीसकाका येथे केवळ स्थुलातून गात आहेत; परंतु सूक्ष्मातून ते उच्च लोकात आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी मला ‘मीही उच्च लोकात आहे’, असे जाणवले.
३. या वेळी मला आरंभी पृथ्वीतत्त्व जाणवले आणि शेवटी थोड्या प्रमाणात आकाशतत्त्व जाणवले.’
(श्री. चिटणीसकाकांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी होण्यापूर्वी त्यांनी गायलेला राग ‘यमन’ मी २ – ३ वेळा ऐकला होता. त्या वेळी मला अधिक प्रमाणात शक्तीची स्पंदने जाणवली होती. त्यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्यावर त्यांनी गायलेला राग ‘यमन’ ऐकतांना मला शांतीची स्पंदने जाणवली. ‘गायन चालू असतांना सर्व स्वरांची स्पंदने ही एकसम (गुणवत्तेनुसार) झाली आहेत’, असे मला जाणवले.)
४. राग मालकंस
४ अ. कु. म्रिणालिनी देवघरे
१. ‘श्री. चिटणीसकाकांच्या आवाजात चैतन्य अधिक प्रमाणात असल्याने थोड्या वेळाने माझे ध्यान लागले. ध्यानातच मला साधारण २० मिनिटे ‘माझ्या सहस्रारचक्रातून शक्तीची स्पंदने प्रवेश करत आहेत’, असे मला जाणवले.
२. या रागात मला आकाशतत्त्व जाणवले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक १७.१२.२०२१)
|