सांगली जिल्हा परिषदेच्या अभियंत्याच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी !
४ खासगी सावकारांना अटक
शासकीय अधिकार्यास जर सावकार जिवे मारण्याची धमकी देत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांविषयी काय घडत असेल ? याचा विचारही करता येत नाही ! – संपादक
ईश्वरपूर (जिल्हा सांगली), २९ डिसेंबर (वार्ता.) – जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंत्याला २३ लाख रुपये व्याजाने देऊन त्याच्याकडे ९५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली, तसेच त्याच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देणार्या सावकारांच्या टोळीच्या विरोधात ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी या ४ सावकारांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी अभियंता बाजीराव दिनकर पाटील यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणी बालम हनीफ जमादार, हिंदुराव बबन मोरे, धैर्यशील संताजीराव पाटील, संभाजी शिवाजी पवार अशी पोलीस कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत.