भाजपचे हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने ‘सनातन पंचांग २०२२’ भेट !
बेळगाव, २९ डिसेंबर (वार्ता.) – पिरनवाडी रस्ता, नावगे क्रॉस गणेश बाग येथे २६ डिसेंबर या दिवशी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून भाग्यनगर येथील भाजपचे हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्या वेळी मेळाव्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी आमदार टी. राजासिंह यांची भेट घेऊन त्यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट दिले. या वेळी धर्मप्रेमी सौ. रेखा पाटील, सनातन संस्थेच्या साधिका सौ. लक्ष्मी हलगेकर आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. पंकज घाडी उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यावर सूत्रसंचालकांनी भाजपचे आमदार टी. राजासिंह यांना ‘सनातनच्या साधिका आणि काही हिंदुत्वनिष्ठ तुमची भेट घेण्यासाठी आले आहेत’, असे सांगितले. त्या वेळी टी. राजासिंह यांना भेटण्यासाठी धर्मप्रेमींची पुष्कळ गर्दी होती. असे असतांना टी. राजासिंह यांनी सर्वांना बाजूला होण्यास सांगून प्राधान्याने सनातनच्या साधिका आणि हिंदुत्वनिष्ठ यांची भेट घेतली. भेट झाल्यावर त्यांनी सर्वांना नमस्कार केला आणि ‘तुम्हाला भेटल्यावर बरे वाटले’, असे सांगितले.