राधानगरी (जिल्हा कोल्हापूर) धरणाच्या द्वाराचे तांत्रिक दुरुस्तीचे काम चालू असतांना द्वार उघडून धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग !

धरणाचे द्वार बंद करण्यात यश

राधानगरी धरणाच्या द्वाराचे तांत्रिक दुरुस्तीचे काम चालू असतांना द्वार उघडून धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग

कोल्हापूर, २९ डिसेंबर (वार्ता.) – राधानगरी धरणाच्या ५ क्रमांकाच्या द्वाराचे २९ डिसेंबर या दिवशी तांत्रिक दुरुस्तीचे काम चालू होते. त्यासाठी द्वार उचलण्यात आले होते. हे उचलण्यात आलेले द्वार बंद न झाल्यामुळे सध्या धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. हे धरण ८.३६ ‘टी.एम्.सी.’ इतक्या क्षमतेचे असून द्वार १८ फुटांनी उघडले गेले आहे. यामुळे पंचगंगा, भोगावती या नद्यांच्या पाणीपातळीत ३-४ फुटांनी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. नदी काठावरील गावांनी नदीवर प्राणी, तसेच कपडे धुवायला जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

धरणातून साधारणत: ४ सहस्र क्युसेक्स विसर्ग चालू होता. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणेने वेगाने  हालचाल करून धरणाचे द्वार बंद करण्यात यश मिळवले आहे.