सोनभद्र (उत्तरप्रदेश) येथे शाळकरी मुलांना देण्यात आली ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची शपथ
सोनभद्र (उत्तरप्रदेश) – येथील एका शाळेतील अल्पवयीन मुलांना नेहरू पार्कमध्ये भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठीची शपथ देण्यात आल्याचा व्हिडिओ ‘सुदर्शन न्यूज’ या राष्ट्रीय हिंदी वृत्तवाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी ट्वीट केले आहे.
सुरेश चव्हाणके जी के समर्थन में हिंदुस्थान
जगह जगह ली जा रही #हिंदुराष्ट्र_की_शपथसोनभद्र में स्कूली बच्चों ने दोहराया छत्रपति शिवाजी महाराज के ‘हिंदवी स्वराज’ का संकल्प#एक_सपना_हिन्दूराष्ट्र pic.twitter.com/ilyrdWptCK
— Sudarshan News (@SudarshanNewsTV) December 28, 2021
‘आम्ही शपथ घेतो की, भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी काम करू. यासाठी आम्ही लढू. यासाठी आम्ही मरण पत्करू आणि आवश्यकता भासल्यास यासाठी मारू. कोणतेही बलीदान देण्याची आवश्यकता पडो, आम्ही एका क्षणापुरतेही मागे हटणार नाही. आमचे पूर्वज, शिक्षक आणि भारतमाता आम्हाला आमची शपथ पूर्ण करण्याची शक्ती देवो’, अशी शपथ या मुलांना देण्यात आल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. शपथेच्या शेवटी ‘भारतमाता की जय’, ‘वन्दे मातरम्’ आणि ‘जय हिंद’ अशा घोषणा देण्यात आल्या.
इनका बस चले तो बग़ैर सुनवाई मुझे फाँसी देते। पर इनके साम दाम दंड भेद का योगेश्वर श्री कृष्ण के #सुदर्शन पर कोई असर होगा नहीं। #हिंदुराष्ट्र_की_शपथ #एक_सपना_हिंदुराष्ट्र https://t.co/FJZ17JbKcw
— Suresh Chavhanke “Sudarshan News” (@SureshChavhanke) December 28, 2021
श्री. सुरेश चव्हाणके यांनी यापूर्वी १९ डिसेंबर २०२१ या दिवशी हिंदु युवा वाहिनीच्या देहलीत झालेल्या कार्यक्रमात स्वतः ही शपथ घेतली होती. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता.