बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे २ गुंडांकडून पोलीस कर्मचार्याला मारहाण !
पोलिसाकडील रायफल गुंडांनी पळवली !
गुंडांकडून मार खाणारे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ? – संपादक
बिजनौर (उत्तरप्रदेश) – येथे २ गुंडांनी पोलीस कर्मचार्याला मारहाण करून त्याच्याकडून रायफल पळवून नेली. भूतपुरी तिराहा पोलीस ठाण्यातील ललित कुमार असे मारहाण केेलेल्या पोलीस कर्मचार्याचे नाव आहे. यात ललित कुमार घायाळ झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाली आहे. पोलीस आता या गुंडांचा शोध घेत आहेत.