(म्हणे) ‘आम्हाला मत दिल्यास २०० रुपयांची दारू ५० रुपयांत देऊ !’
तेलंगाणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांचे जनताद्रोही आवाहन !
|
भाग्यनगर (तेलंगाणा) – भाजपला मत दिल्यास ५० रुपयांत चांगल्या दर्जाची दारू देऊ, असे आश्वासन भाजपचे तेलंगाणा प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांनी दिले आहे. सध्या चांगल्या दर्जाची दारू २०० रुपयांमध्ये मिळते. पक्षाच्या जाहीर सभेत तेे बोलत होते. राज्यात निकृष्ट दर्जाची दारू चढ्या भावाने विकल्यामुळे त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. (राज्यात दुधात आणि अन्य खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जाते, त्याविषयी सोमराजू यांना बोलावेसे का वाटले नाही ? – संपादक) ‘राज्यात बर्याच आस्थापना अधिक किमतीत दारू विकतात, तर दारूची निर्मिती करणारी लोकप्रिय आस्थापने राज्यात उपलब्ध नाहीत’, असा आरोप त्यांनी केला.
Andhra Pradesh BJP president Somu Veerraju promises to give liquor at Rs 50 https://t.co/4yh3NjXz9H
— The Times Of India (@timesofindia) December 29, 2021
वीरराजू पुढे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक व्यक्ती दारूवर प्रत्येक मासाला १२ सहस्र रुपये खर्च करत होती. हे पैसे सरकारी तिजोरीत जमा होतात आणि याच पैशांचा वापर सरकारी योजना चालवण्यासाठी केला जातो. राज्यातील १ कोटी लोक दारूचे सेवन करत आहेत. त्यामुळे वर्ष २०२४ च्या निवडणुकीत या १ कोटी लोकांनी भाजपला मतदान करावे, अशी आमची इच्छा आहे. जर भाजपाला १ कोटी मते मिळाली, तर राज्यात ७५ रुपये प्रति बाटली या दराने चांगल्या दर्जाची दारू मिळेल. जर अधिक महसूल मिळाला, तर हीच दारू ७५ रुपयांऐवजी ५० रुपये प्रति बाटलीने विकली जाईल.