इंग्लंड आणि शारजहा येथून आलेले ५ जण कोरोनाबाधित !
पणजी – इंग्लंड आणि शारजहा येथून गोव्यात आलेल्या प्रवाशांपैकी ५ जण कोरोनाबाधित आढळले असून त्यांच्या लाळेचे नमुने कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’च्या चाचणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहेत.
#Covid19 Update – Goa
Testing in full swing at the Airport.
Air India G9492 from UK –
181 passengers tested
4 tested positive for Covid-19Air Arabia AI 146 from Sharjah –
49 passengers tested
1 tested positive for Covid-19Their samples have been sent for genome sequencing.
— VishwajitRane (@visrane) December 28, 2021
तृणमूलचे नेते तथा खासदार लुईझिन फालेरो कोरोनाबाधित
पणजी राज्यसभेचे खासदार तथा तृणमूलचे नेते लुईझिन फालेरो हे कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांच्यासह त्यांचे सहकारी तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन हेही कोरोनाबाधित झाले आहेेत. या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करण्याची सूचना केली आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू असल्याने लुईझिन फालेरो सध्या नवी देहली येथे आहेत.