३१ डिसेंबरच्या रात्री शिर्डी येथील साई मंदिर बंद राहील !

नगर – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरच्या रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत साई समाधी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या सूचनेनुसार साई संस्थानने घेतला आहे. येथे २५ डिसेंबरपासून रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदी आहे. शेजारती आणि काकड आरतीलाही भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही, असेही सांगण्यात आले आहे. प्रतिवर्षी ३१ डिसेंबरच्या रात्री भाविकांना दर्शन घेण्यासाठी मंदिर उघडे ठेवले जात होते.