परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा असलेला ५९ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बडोदा, गुजरात येथील कु. अद्वैत रविंद्र पोत्रेकर (वय ८ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. अद्वैत रवींद्र पोत्रेकर हा या पिढीतील एक आहे !
‘मार्गशीर्ष कृष्ण पक्ष एकादशी ३०.१२.२०२१ या दिवशी बडोदा, गुजरात येथील कु. अद्वैत रवींद्र पोत्रेकर याचा ८ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या आईला त्याच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
कु. अद्वैत रवींद्र पोत्रेकर यास सनातन परिवाराकडून ८ व्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभाशीर्वाद !
१. रामनाथी आश्रमातील भोजनकक्षात घसरून पडल्याने अद्वैतच्या मांडीचे हाड पिळून मोडल्यामुळे आधुनिक वैद्यांनी ‘शस्त्रकर्म करावे लागेल’, असे सांगणे
१२.१०.२०२० या दिवशी सकाळी १०.१५ वाजता रामनाथी आश्रमातील भोजनकक्षात कु. अद्वैत सावकाश चालत असूनही माझ्या समोर घसरून पडला आणि त्याच्या मांडीचे हाड मोडले. ते पाहून आधुनिक वैद्यांनाही आश्चर्य वाटले, ‘लहान मुलाचे मांडीचे हाड सहजासहजी मोडत नाही; मात्र याच्या मांडीचे हाड पिळून मोडले होते. त्यामुळे आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘त्याचे मोठे शस्त्रकर्म करावे लागेल.’’
२. तीव्र वेदना होत असतांनाही ‘प.पू. डॉक्टर, प.पू. डॉक्टर’, असा नामजप करणे
अद्वैत पडल्यावर त्याला तीव्र वेदना होत होत्या. तेव्हाही तो त्याला सांगितलेले सर्व समजून घेऊन त्याप्रमाणे करत होता. घसरून पडल्यापासूनच त्याचा ‘प.पू. डॉक्टर, प.पू. डॉक्टर’, असा नामजप चालू होता. त्याला भोजनकक्षातून उचलून घेऊन जातांनाही तो मोठ्याने ‘प.पू. डॉक्टर, प.पू. डॉक्टर’, असे रडत रडत म्हणत होता. नंतर त्याला नामजप करायची शक्ती नव्हती; म्हणून तो मला त्याच्या कपाळावर हात ठेवून हा नामजप करायला सांगत होता.
३. कु. अद्वैतने पू. पृथ्वीराज हजारेकाकांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरांची शक्ती मिळाल्याचे सांगणे
पू. हजारेकाका (सनातनचे २५ वे संत पू. पृथ्वीराज हजारे) अद्वैतला पहायला आले होते. ते त्याला बरे वाटावे; म्हणून त्याच्याशी पुष्कळ वेळ बोलत होते. ते गेल्यानंतर अद्वैत म्हणाला, ‘‘आई, पू. हजारेकाका मला परात्पर गुरु डॉक्टरांची शक्ती देऊन गेले.’’
४. पुष्कळ वेदना होत असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असणे आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांना भ्रमणभाषवर ‘श्री विष्णवे नमः ।’ हा जप भावपूर्ण करून दाखवणे
दुपारी ३.३० नंतर त्याला आधुनिक वैद्यांनी तपासायला घेतले. तेव्हा त्याचा नामजप चालूच होता. तो सतत ‘प.पू. डॉक्टर, मला सहन करण्याची शक्ती द्या’, असे म्हणत होता. रात्री मी पू. (सौ.) संगीता जाधव यांना भ्रमणभाष करून त्याच्याविषयी सांगितले. थोड्या वेळाने पू. जाधवकाकूंचा भ्रमणभाष आला. थोडे बोलून झाल्यावर त्याने पू. काकूंना ‘श्री विष्णवे नमः ।’ हा नामजप म्हणून दाखवला. त्याविषयी पू. काकू मला म्हणाल्या, ‘‘तो एवढा छान नामजप करत होता की, ‘मला ऐकतच रहावे’, असे वाटत होते. ‘त्याच्या बोलावण्याने देवाला यावेच लागेल’, असा भावपूर्ण नामजप तो करत होता; म्हणून मी भ्रमणभाष बंद न करता त्याचा नामजप ऐकत होते.’’
५. आधुनिक वैद्य आल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टरच आले’, असे वाटल्याने अद्वैतची ‘वॉकर’ घेऊन उभे रहाण्याची भीती उणावणे
शस्त्रकर्म झाल्यावर १६.१०.२०२० या दिवशी त्याला प्रथमच ‘वॉकर’ घेऊन उभे करायचे होते. त्यासाठी आधुनिक वैद्य राकेश देशमाने आल्यावर आम्हा दोघांना ‘परात्पर गुरु डॉक्टरच आले आहेत’, असे वाटले. त्यामुळे अद्वैतची भीतीही उणावली.
६. सद्गुरु पिंगळेकाका आणि अद्वैत यांच्यातील संभाषण
१२.११.२०२० या दिवशी सकाळी १०.३० वाजता सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांनी भ्रमणभाषवर संपर्क करून अद्वैतला सत्संग दिला. त्या वेळी सद्गुरु पिंगळेकाका त्याला म्हणाले, ‘‘एकाच जन्मात आपण अनेक जन्म घेत असतो आणि साधनेमुळे आपले प्रारब्ध अल्प होत असते. या शस्त्रकर्मानंतर तुझा पुनर्जन्म झाला आहे. तुझे प्रारब्ध अल्प झाले आहे. आपल्याला मोक्षप्राप्ती करायची आहे आणि परात्पर गुरु जेव्हा जेव्हा अवतार घेतात, तेव्हा आपल्याला त्यांच्या समवेत पुन्हा जन्म घ्यायचा आहे.’’
७. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याशी बोलल्यावर प्रारब्ध आणि पुनर्जन्म यांचा उलगडा होणे
एकदा मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई भेटल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘तुम्हाला परात्पर गुरु डॉक्टरांनी अलगद उचलून येथे आणले आहे. फार मोठे प्रारब्ध होते; पण देवाने ते केवळ एका हाडावर फेडले आहे.’’ तेव्हा सद्गुरु पिंगळेकाका ‘अद्वैतचा पुनर्जन्म झाला आहे आणि त्याचे फार मोठे प्रारब्ध होते’, असे म्हणाले होते. त्याचा नेमका अथे काय होता ?’, ते आज माझ्या लक्षात आले.’
– सौ. सोनाली रवींद्र पोत्रेकर (कु. अद्वैतची आई), बडोदा, गुजरात. (२६.११.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |