पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर येथे होण्याची शक्यता !
मुंबई, २८ डिसेंबर (वार्ता.) – २७ डिसेंबर या दिवशी विधीमंडळ कामकाज समितीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत पुढील अधिवेशन घेण्याविषयी चर्चा करण्यात आली. त्यानुसार राज्याचे पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर येथे २८ फेबु्रवारी २०२२ या दिवशी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे मंत्री, आमदार यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी तशी मागणी केली होती.