‘कोव्हॅक्सिन’ या स्वदेशी लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले ! – सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा
भाग्यनगर (तेलंगाणा) – ‘भारत बायोटेक’ आस्थापनाच्या भारतीय ‘कोव्हॅक्सिन’ या कोरोना प्रतिबंधात्मक लसीला जागतिक आरोग्य संघटनेने नोव्हेंबर मासामध्ये संमती दिली; मात्र त्यापूर्वी या स्वदेशी लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले होते. ‘फायझर’सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय आस्थापनांनी भारतातील काही लोकांशी हातमिळवणी करून ‘कोव्हॅक्सिन’ला अपकीर्त करण्याचे अनेक प्रयत्न केले होते. त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेकडेही तक्रार केली होती, असे विधान सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी येथे केले. ‘रामिनेनी फाऊंडेशन’च्या पुरस्कार सोहळ्याच्या वेळी ते बोलत होते. (यावरून जागतिक स्तरावर भारतीय आस्थापनांचे पाय ओढण्याचे कसे प्रयत्न केले जातात, हे यातून दिसून येते ! – संपादक)
MNCs tried to scuttle WHO nod for Covaxin: CJI Ramana https://t.co/7wcZQIPuBt pic.twitter.com/ENaoX7lUfV
— The Times Of India (@timesofindia) December 26, 2021
सरन्यायाधीश रमणा पुढे म्हणाले की, भारत बायोटेकचे कृष्णा एला आणि सुचित्रा यांनी येथपर्यंत पोचण्यासाठी मोठा संघर्ष केला. आज त्यांच्यामुळे देशाला प्रसिद्धी मिळाली. ही लस बनवणार्या तेलुगु आस्थापनाचे महान कार्य जगाला सांगण्यासाठी तेलुगु लोकांनी पुढे आले पाहिजे.