३१ डिसेंबर साजरा करणे, हे वर्षभराचे धर्मांतर ! – सौ. रति हेगडे, स्तंभलेखिका
३१ डिसेंबरला होणारे धर्मांतर हे एक दिवसाचे नसून वर्षभराचे असते; कारण वर्षभर ‘ग्रेगेरियन’ दिनदर्शिका वापरली जाते. स्वतःची आधुनिकता दाखवण्यासाठी हिंदू मद्यपान, मांसाहार, अमली पदार्थांचे सेवन करणे आदी गोष्टी सर्रासपणे करतात.
३१ डिसेंबर हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो; परंतु आनंदी रहाण्यासाठी अशा प्रकारचे वर्तन करण्याची आवश्यकता नाही, हे लक्षात घ्यायला हवे. जो उत्साह वाढवतो, तो उत्सव ! ३१ डिसेंबरच्या रात्री केलेल्या कृतींनी उत्साह वाढत नाही. आपण ‘हिंदु’ म्हणून प्रतिदिनच्या कृती करत आहोत का ? याचाही विचार हिंदूंनी करायला हवा.