हिंदी चित्रपट ‘अतरंगी रे’मधून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन
हिंदु नायिकेच्या कुटुंबियांना मुसलमान नायकाला ठार मारतांना दाखवले !
|
मुंबई – हिंदी चित्रपट ‘अतरंगी रे’ यामधून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्यात आल्याचे दिसून येत आहे. यामध्ये अभिनेता अक्षय कुमार यांनी ‘सज्जाद’ नावाच्या मुसलमान तरुणाची, तर अभिनेत्री सारा अली खान हिने ‘रिंकू’ नावाच्या हिंदु तरुणीची भूमिका वठवली आहे. या दोघांमध्ये प्रेम असल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच या प्रेमाला विरोध करतांना रिंकूचे कुटुंबीय सज्जाद याला जिवंत जाळतात, अशी या चित्रपटाची कथा आहे.
Bollywood’s #Hinduphobia yet again!#Boycott_Atrangi_Re as it showcases
👉”Dharmic” Hindus are violent & “peacefuls” are victims
👉Existence of so-called #Islamophobia in India
We condemn @aanandlrai @DisneyPlusHS for this!
Please take cognizance @MIB_India pic.twitter.com/7T5Nhhy245
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 28, 2021
या चित्रपटातून हिंदू हे ‘हिंसाचारी’, तर मुसलमान हे ‘पीडित’ दाखवण्यात आले आहेत. श्रीरामाचे वंशज कसे हिंसाचारी आहेत, हे यातून दाखवण्यात आले आहे. पूजा, हवन आदी करणारे हिंदू हत्या करतात, अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल्. रॉय आहेत.
Hinduphobic Bollywood is seen repeating it’s filthy formula once again #Boycott_Atrangi_Re on @DisneyPlusHS for it
📌 Denigrates Hindu Dieties & sacred texts
📌 Promotes #lovejihaad
📌 Wrongly depicts Hindus as violent
Hindus request @MIB_India to ban this movie pic.twitter.com/Elca1IEqRi
— Sanatan Prabhat (Kannada) (@Sanatan_Prabhat) December 28, 2021
चित्रपटातील हिंदुविरोधी सूत्रे१. चित्रपटातील नायिका रिंकू ही ‘सूर्यवंशी ठाकूर’ घराण्यातील दाखवण्यात आली आहे. हे कुटुंब भगवान श्रीरामांचे वंशज असल्याचे सांगण्यात आले आहे; मात्र या कुटुंबातील महिला अणि पुरुष यांना अमानुष असल्याचे दाखवण्यात आले आहे. २. रिंकूचे पालक तिचा विवाह तमिळ तरुणाशी बलपूर्वक करण्याचा प्रयत्न करतात. या तरुणाचे नाव ‘विशू’ आहे. हे देवाचे नाव असल्याचे सांगत रिंकू त्याला ‘पृथ्वीवरील नाव काय आहे’, असे विचारते. (Bollywood का दोगालापन, Recent Bollywood Movie Atarangi Re Again promoting LOVE JIHAD Insulting Hindu God. Presenting Hindu as Gunda.) ३. रिंकू एका तरुणाशी विवाह करू इच्छित असते ज्याचे नाव ‘सज्जाद’ आहे. रिंकू सज्जाद याला प्रत्यक्ष नाही, तर काल्पनिक स्तरावर प्रेम करत असते. एका प्रसंगामध्ये सज्जाद रिंकूला सांगतो की, तो स्वतः ‘राम’ आहे, तर विशू ‘रावण’ आहे. ४. मुळात सज्जाद हा रिंकूचा पिता असतो. रिंकूच्या आईचे सज्जादवर प्रेम असते. ती सज्जादशी विवाह करते. त्यांना रिंकू हे अपत्य होते. या विवाहामुळे अप्रसन्न असलेल्या रिंकूच्या आईचे कुटुंबीय सज्जाद याला जिवंत जाळून ठार करतात. याच सज्जादवर रिंकू काल्पनिक स्तरावर प्रेम करत असते; मात्र हे तिच्या कुटुंबियांना ती सांगत नाही. |
#Boycott_Atrangi_Re हा ट्विटर ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर प्रथम स्थानी !
‘अतरंगी रे’ या हिंदुद्रोही चित्रपटाच्या विरोधात भारतभरातील हिंदुत्वनिष्ठांनी २८ डिसेंबरच्या सायंकाळी ट्विटरवरून ट्रेंड केला (चर्चेत आणला गेला). #Boycott_Atrangi_Re हा हॅशटॅग (एखाद्या विषयावर घडवली जाणारी चर्चा) वापरून हा ट्रेंड करण्यात आला. हा ट्रेंड थोड्याच वेळात राष्ट्रीय स्तरावर प्रथम स्थानी आला. तो साधारण २ घंटे प्रथम स्थानी होता. ट्रेंडच्या माध्यमातून ‘अतरंगी रे’ चित्रपटाच्या विरोधात ३५ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या.
‘राष्ट्रद्रोही आणि हिंदुद्रोही घटनांचा संयत मार्गाने निषेध करा !’ हिंदुद्रोह्यांचा निषेध करण्यामागचा मुख्य उद्देश त्यांचे वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कोणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणाऱ्या व्यक्तीला तिच्या चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा व्यापक दृष्टीकोन निषेध व्यक्त करण्यामागे हवा ! |