आनंदे रमावे गुरु साधनेत ।

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका पुष्पांजली पाटणकर यांनी श्रीगुरूंना लिहिलेले काव्यरूपी आत्मनिवेदन  येथे प्रसिद्ध करत आहोत. त्यातून त्यांचा श्रीगुरूंप्रतीचा भाव दिसून येतो.

देवा पत्रास झाला ना उशीर ।
क्षमा करावी देवा, लाविते चरणी शिर ।। १ ।।

देवा, ना तुला राग, ना लोभ ।
उशीर किंवा त्वरित, तुला ना क्षोभ ।। २ ।।

पुष्पांजली पाटणकर

तू तर देवा, सदैव असशी त्रिगुणातीत ।
तुला पत्र लिहावे ही आहे जनरीत ।। ३ ।।

भूत-भविष्य वर्तमानही तुला ठावे ।
हे सारे जाणूनी साधकापाठी उभे रहावे ।। ४ ।।

दाखविशी तू जना प्रारब्ध-संचिताचा खेळ ।
त्याचसाठी साधकांना वर्तमानकाळी देतोस वेळ ।। ५ ।।

सांग ना देवा, कशास सांगावे तुझे वय ।
रंगरूप असे साठीचे, केस सांगती सत्तरीचे वय ।। ६ ।।

संबंध नसे रंग-रूप अन् वयाचा ।
संबंध असे केवळ तुझ्या कार्याचा ।। ७ ।।

शस्त्र-अस्त्र यांचा आधार न घेता कृष्ण लढला ।
पांडवांना पुढे करूनी जय त्यानेच मिळवला ।। ८ ।।

तिसर्‍या महायुद्धात जय मिळवणे हेच एक ध्येय ।
याचसाठी ‘अहंनिर्मूलन’ हीच साधना एकमेव ।। ९ ।।

ते ध्येय समोर ठेवून करीत रहावी साधना ।
सर्व‘स्व’ अर्पावे भगवंता, हेच ठावे मना ।। १० ।।

सर्वस्व अर्पिता कुठे रहाते माझे तन-मन-धन ।
देवच करतो सारे, व्यापून रहातो कणन्कण ।। ११ ।।

आपण सारे त्याच्या हातातील बाहुले होतो ।
दोरी त्याच्या हाती, तो साधका नाचवितो ।। १२ ।।

नित्य त्याचे नाम-रूप स्मरावे ।
आणि गुरु साधनेत आनंदे रमावे ।। १३ ।।

– कृष्णपुष्प (पूर्वाश्रमीच्या पुष्पांजली), बेळगाव (२७.७.२०२१)