साधिकेला परात्पर गुरु डॉक्टरांची पुष्कळ आठवण येऊन त्यांच्या भेटीचा विषय निघाल्यावर ‘स्वतःचे साधनेचे प्रयत्न अल्प होत आहेत’, अशी जाणीव होऊ लागणे

साधिकेला परात्पर गुरु डॉक्टरांची पुष्कळ आठवण येऊन ‘त्यांना भेटावे’, असे वाटत असतांना त्यांच्या सुवचनाची आठवण येऊन त्यांच्या भेटीचा विषय निघाल्यावर ‘स्वतःचे साधनेचे प्रयत्न अल्प होत आहेत’, अशी जाणीव होऊ लागणे

कु. सुप्रिया जठार

‘एकदा मला परात्पर गुरु डॉक्टरांची पुष्कळ आठवण येत होती. ‘त्यांना भेटावे आणि त्यांच्याशी बोलावे’, असे मला वाटत होते. त्या वेळी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या वेळी आश्रमात लावलेल्या त्यांच्या एका सुवचनाची आठवण झाली. ते सुवचन पुढीलप्रमाणे आहे, ‘ओढ असली पाहिजे. तळमळ असली पाहिजे, ती देव भेटावा, याची नाही; तर स्वतःची साधना नीट होण्याची असली पाहिजे !’ त्यानंतर कुणी परात्पर गुरु डॉक्टरांची भेट झाल्याविषयी अथवा त्यांचे दर्शन झाल्याविषयी सांगत. तेव्हा ‘मी साधनेत न्यून पडत असून मला अजून पुष्कळ प्रयत्न करायचे आहेत’, याची जाणीव होऊ लागली.’

– कु. सुप्रिया जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (जून २०१८)