विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली !
मुंबई – काँग्रेसचे नेते, तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, तसेच अन्न-नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ अन् शिवसेनेचे नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम राज्यपालांना दिला आहे. त्यांनी लवकर संमती द्यावी, यासाठी त्यांची भेट घेण्यात आली. ‘विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम उद्याच जाहीर करावा’, अशीही त्यांना विनंती करण्यात आली आहे. ‘ते हा कार्यक्रम संमत करतील’, अशी आम्हाला निश्चिती आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
(सौजन्य : ABP MAJHA)
या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यपालांनी सरकारला अध्यक्ष निवडणुकीविषयी पत्र दिले होते. त्या अनुषंगानेच मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले पत्र आम्ही त्यांना दिले आहे. येत्या दोन दिवसांत ही निवडणूक व्हावी, अशी आम्ही मागणी केली आहे. याविषयी कायदेशीर चर्चा करून यावर ते २७ डिसेंबर या दिवशी निर्णय कळवणार आहेत.