मी इस्लामला मानत नसून मला ‘भगवद्गीता’ या ग्रंथाद्वारे हिंदु धर्माच्या तर्कशुद्ध पैलूंविषयी जाणून घ्यायचे आहे !
|
प्रत्येक वेळी हिंदू आणि हिंदु धर्मग्रंथ यांच्या नावे ओरड करणारे आता गप्प का ?
मुंबई – मी जन्माने मुसलमान आहे; पण मी कोणत्याही मुसलमान मुलाशी लग्न करणार नाही. मुसलमान पुरुषांना नेहमीच त्यांच्या महिलांना नियंत्रणात ठेवायचे असते. (हे आहे मुसलमानांचे खरे स्वरूप ! – संपादक) त्यामुळे मी इस्लाम मानत नाही. मी सध्या ‘भगवद्गीता’ वाचत आहे. मला हिंदु धर्माच्या तर्कशुद्ध पैलूंविषयी अधिक जाणून घ्यायचे आहे. मला या पवित्र ग्रंथातील चांगल्या गोष्टी शोधायच्या आहेत, असे विधान ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री उर्फी जावेद हिने केले आहे. (जे एका मुसलमान अभिनेत्रीला कळते, ते निधर्मीवादी, पुरोगामी यांना का कळत नाही ? – संपादक)
ती पुढे म्हणाली, ‘‘मला ‘ट्रोल’ (सामाजिक माध्यमांवर विरोध) करणारे बहुतेक लोक मुसलमान आहेत. ‘मी इस्लामची प्रतिमा खराब करत आहे’, असे त्यांना वाटते. ते माझा द्वेष करतात; मात्र मी कोणताही धर्म पाळत नाही. प्रत्येकाला कोणत्याही धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.’’