सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून माझ्या हत्येचा कट !
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा आरोप
सांगली – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, पवार कुटुंबीय आणि पोलीस प्रशासन यांनी माझ्या कुटुंबियांच्या हत्येचा कट रचला होता, असा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
(सौजन्य : MARATHI DG NEWS)
या संदर्भात आटपाडी पोलीस ठाण्याच्या समोरील ७ नोव्हेंबर २०२१ चा एक व्हिडिओ शेअर करून गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘‘माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या दुसर्या बाजूने २०० लोकांचा जमाव लाठ्या-काठ्यासंह उभा होता, प्रारंभी माझ्या गाडीवर दगड फेकण्यात येत होते आणि गाडीचा वेग अल्प होताच भरधाव ट्रक माझ्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला. नंतर जमावाकडून आक्रमण करायचे, असा कट होता. हा कट पोलीस संरक्षणात घडवून आणला गेला. माझ्यावर आक्रमण झाल्यावर उलट याप्रकरणी माझ्या अंगरक्षकालाच निलंबित करत माझ्यावरच कलम ३७० अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.’’
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, ‘‘गोपीचंद पडळकर यांनी केलेला हा आरोप प्रसिद्धीसाठी केलेला आहे.’’