केरळ येथील श्री. साईदीपक यांना ‘ऑनलाईन विशेष संवाद’ कार्यक्रमात अभिप्राय संकलनाची सेवा करतांना आलेल्या अनुभूती

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना प्रार्थना केल्यावर त्यांचे भव्य रूप डोळ्यांसमोर येऊन ‘त्यांनी आशीर्वाद दिला’, असे जाणवणे

‘२.१.२०२१ या दिवशी मला हिंदु जनजागृती समितीच्या ‘ऑनलाईन विशेष संवाद’ कार्यक्रमात अभिप्राय संकलनाची सेवा मिळाली होती. संवादाच्या शेवटी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘आपल्याला अध्यात्मप्रसाराचे प्रयत्न हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने करायचे आहेत.’’ तेव्हा मी सद्गुरु पिंगळेकाकांना प्रार्थना केली, ‘तुम्हीच माझ्यात असे प्रयत्न करण्याची तळमळ निर्माण करा.’ मी प्रार्थना करताक्षणीच माझ्या डोळ्यांसमोर त्यांचे भव्य रूप आले. त्यांनी माझ्याकडे हसतमुखाने पाहून मला आशीर्वाद दिला. त्यांचे रूप मोठे होत गेले. ते पाहून माझा भाव दाटून आला. त्यानंतर अनेक घंटे माझे मन शांत होते. मला ही स्थिती शब्दांत व्यक्त करणे फार कठीण आहे.

श्री. साईदीपक

२. सेवा केल्यावर डोळ्याची स्थिती सुधारणे

मला एका डोळ्याने बारीक अक्षर वाचतांना त्रास होतो, तरीही मी सेवा चालू केली. मी झोकून देऊन सेवा केल्यावर माझ्या डोळ्यांवर येणारा ताण न्यून झाला. ‘माझ्या डोळ्यांची स्थिती सुधारत आहे’, असे मला जाणवले.’

– श्री. साईदीपक, केरळ (२०.१.२०२१)