‘काळानुसार नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर सर्व नियोजन अन् कार्य करून घेत आहेत’, असे देवीने सूक्ष्मातून सांगण्याविषयी साधकाला आलेली अनुभूती
‘७.१०.२०१९ या रात्री ९.३० ते १० या वेळेत मी नामजप करत होतो. तेव्हा मला दिसले, ‘एक प्रतिष्ठित व्यक्ती सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना भेटायला येत आहे.’ मला वाटले, ‘ती व्यक्ती अशी अकस्मात कशी येईल ?’ तेव्हा देवीनेच उत्तर दिले, ‘ती व्यक्ती देवीची भक्त आहे. त्यामुळे प्रत्यक्ष दुर्गादेवीनेच गुरुदेवांना भेटण्याचा विचार तिच्या मनात घातला आहे.’ त्यानंतर माझ्या मनात विचार आला, ‘देवी असे का करते आहे ?’ तेव्हा उत्तर मिळाले, ‘परात्पर गुरुदेव प्रत्यक्ष नारायणस्वरूप आहेत. तेच सगळे नियोजन आणि कार्य काळानुसार करून घेत आहेत. त्यामुळे हा सगळा प्रसंग ईश्वरी नियोजनाप्रमाणे आणि काळानुसार होत आहे.’ हे उत्तर ऐकून पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि भावजागृती झाली.’
– श्री. कार्तिक साळुंके, देहली (७.१०.२०१९)