भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने नामजप होत असल्याविषयी साधकाला आलेल्या अनुभूती
१. नामजप करतांना झोप लागल्यावर ‘कुणीतरी हालवून उठवत आहे’, असा भास होणे आणि त्या वेळी जवळ कुणी नसल्याने ‘गुरुमाऊलीनेच हालवून जागे केले’, असे साधकाला वाटणे : ‘भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर, आपल्या कृपाशीर्वादाने माझा नामजप पुष्कळ वेळ होत आहे. एकदा नामजप करतांना झोप लागली, तर ‘कुणीतरी जोरात हालवून उठवत आहे’, असा मला भास झाला. जागे होऊन पाहिले, तर जवळ कुणीच नव्हते. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘गुरुमाऊलीच मला हालवून जागे करतात आणि ‘नामजपात खंड पडू नये’, याची जाणीव करून देतात. मला ४ – ५ वेळा अशी जाणीव झाली.
२. साधकाला झोपेतून जाग आल्यावर नामजप चालू असल्याचे जाणवणे : रात्री झोपेतून जाग आल्यावर माझा नामजप चालू असतो आणि झोप लागली की, सकाळी जागे झाल्यावर पुन्हा नामजप चालू होतो. यासाठी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. रघुनाथ रंगनाथ चौधरी (वय ७४ वर्षे), कडा, आष्टी, बीड. (महाराष्ट्र्र) (६.८.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |