हसतमुख, आनंदी आणि समाधानी अन् सेवाभावी वृत्ती असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या संभाजीनगर येथील कु. चैताली डुबे !

संभाजीनगर येथे सेवा करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. चैताली डुबे यांची मोठी बहीण सौ. उज्ज्वला चिद्रावार आणि चुलत बहीण सौ. अमृता वडगावकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

कु. चैताली डुबे

लेखिका : सौ. उज्ज्वला चिद्रावार (कु. चैताली यांची मोठी बहीण), परभणी

१ अ. प्रेमभाव : ‘कु. चैतालीला सेवा असतांनाही ती सणांच्या दिवशी आम्हाला आठवणीने भ्रमणभाष करून आमच्याशी बोलते.

१ आ. हसतमुख आणि आनंदी

१. ती पुष्कळ आनंदी असते. तिच्याशी कुणी नकारात्मक बोलत असले, तरी त्या गोष्टीचा ताण न घेता ती हसतमुख राहून आनंदाने उत्तरे देते.

२. माझ्या मनात तिच्याविषयी विचार जरी आला, तरी मला लगेच तिचा आनंदी तोंडवळा समोर दिसून माझ्या मनात आनंद निर्माण होतो. एके दिवशी मला अस्वस्थ वाटत होते. माझ्या मनावर ताण होता. तेव्हा ‘तिच्याशी बोलावे’, असा विचार मी केला आणि मला तिचा हसरा तोंडवळा आठवला. तेव्हा लगेच माझी अस्वस्थता न्यून झाली आणि मला आनंद झाला.

१ इ. समाधानी वृत्ती : ती सध्या पूर्णवेळ साधना करते. काही कारणानिमित्त ती गावाला जातांना तिला भावाने पैसे दिले, तर ती कधीच ‘अजून हवेत’, असे म्हणत नाही. जेवढे पैसे दिले आहेत, त्यामध्ये ती समाधान मानते.

१ ई. आम्हा सर्व बहिणींची ती लाडकी आहे.

१ उ. काटकसरीपणा : पुणे येथे शिक्षण घेत असतांना तिला पैसे पाठवल्यावर ती कधीच अनावश्यक व्यय करायची नाही.

१ ऊ. प्रत्येक गोष्ट सहजतेने स्वीकारणे : तिने परात्पर गुरुदेवांच्या भावसोहळ्याच्या वेळी रांगोळी काढली होती. त्या वेळी मी तिला म्हणाले, ‘‘तू लहान बाळासारखी रांगोळी काढली आहेस. अशी रांगोळी काढतात का ?’’ मी असे म्हटल्यावर तिने पुष्कळ हसतमुखाने हा प्रसंग स्वीकारला आणि म्हणाली, ‘‘अगं ताई, मला अजून तेवढी सवय नाही.’’

१ ए. स्थिरता : तिच्यापेक्षा वयाने लहान बहिणीचा विवाह होता. तेव्हा मला वाटले, ‘हिच्या मनाची स्थिती कशी असेल ? तिला काही त्रास होईल का ?’; परंतु तिने विवाह सोहळ्यात पुष्कळ सेवा केली. तिची ध्येयनिश्चिती बळकट असल्याने तिच्या मनामध्ये कोणतेच विचार न येता ती प्रत्येक कृती सेवा म्हणून करत होती. मी जर कधी बहिणीकडून अपेक्षा ठेवल्या आणि चिडले, तर ती मला पुष्कळ चांगल्या प्रकारे समजावून सांगते.

१ ऐ. कोणतेही काम सेवा म्हणून मनापासून करणे : चुलत बहिणीच्या विवाहासाठी ती गावाला आली असतांना तिला चप्पल ठेवण्याचे कपाट स्वच्छ करण्यास सांगितले होते. त्या वेळी ‘तिला हे काम सांगायला नको होते’, असे वाटून मला वाईट वाटले; परंतु तिने ते काम सेवा म्हणून मनापासून केले.

१ ओ. धर्माचरणाची आवड : ती पुणे येथे शिक्षण घेत असतांना ‘हातात बांगड्या घालणे’, अशा कृती करायची. तिच्या मैत्रिणींना हे आवडत नसे आणि त्या ‘तू हे करू नकोस’, असे तिला सांगायच्या. अशा वेळी ती त्यांना धर्माचरणाचे महत्त्व समजावून सांगत असे. तिने त्यांच्यात राहूनही धर्माचरण करण्याचा प्रयत्न केला.

१ औ. ‘साधनेमध्ये लहान-मोठे, असे काही नसते’, याची जाणीव होणे : परात्पर गुरुदेवांचा भावसोहळा पहात असतांना परात्पर गुरुदेवांचे भाऊ पू. भाऊकाका ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्यापेक्षा (पू. भाऊकाका यांच्यापेक्षा) वयाने लहान असूनही ते किती पुढे गेले आहेत’, असे म्हणून त्यांचे कौतुक करत होते. तेव्हा मला वाटले, ‘आम्हीही पाच बहिणी आहोत. त्यामध्ये कु. चैताली सर्वांत लहान आहे; परंतु ‘गुरुदेवच तिच्या माध्यमातून चांगली सेवा करून घेत आहेत’, असे मला वाटले. त्यातून ‘साधनेमध्ये लहान-मोठे असे काही नसते’, हे माझ्या लक्षात आले.

१ क. काही दिवसांपूर्वीच मी तिला म्हणाले, ‘‘तुझ्या तोंडवळ्याकडे पाहून पुष्कळ छान आणि तेज वाटते.’’

लेखिका : सौ. अमृता वडगावकर (कु. चैताली यांची चुलत बहीण), धारूर

२ अ. सकारात्मकता

२ अ १. ‘साधनेचे प्रयत्न होतील’, असे सकारात्मक राहून बहिणीला सांगणे : एकदा मी तिला सांगितले, ‘‘आज माझे संध्याकाळी ६ वाजेपर्यंत साधनेचे प्रयत्न काहीच झाले नाहीत.’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘अजून दिवस संपायला पुष्कळ वेळ आहे. तुझे प्रयत्न होतील.’’ ‘या प्रसंगावरून ती किती सकारात्मक विचार करते’, असे मला वाटले.

२ अ २. ‘घरी गेल्यावर साधना होणार नाही’, असे बहिणीला वाटल्यावर सकारात्मक रहाण्यास सांगून घरी सर्वांना प्रेम देण्यास सांगणे : मला पुणे येथून माझ्या गावी जायचे होते; परंतु ‘माझी तिकडे गेल्यावर काहीच साधना होणार नाही’, असे मला वाटत होते. तेव्हा चैताली म्हणाली, ‘‘गुरुदेवांना अपेक्षित आहे, असेच होईल. तू तिकडे गेल्यावर घरच्यांना पुष्कळ प्रेम दे.’’

२ आ. ‘मी चैतालीला दोन दिवसांपूर्वी भ्रमणभाषवर ‘व्हिडिओ कॉल’ करून संपर्क केला होता. तेव्हा मी तिला पहाताच म्हणाले, ‘‘तू किती गोरी आणि छान दिसत आहेस !’’

(वरील सर्व सुत्रांचा दिनांक २१.८.२०२०)


कु. साक्षी रुद्रकंठवार

श्रीकृष्णाची चैताली ।

कु. चैताली डुबे यांची भाची कु. साक्षी रुद्रकंठावार हिने केलेली कविता येथे देत आहोत.

‘श्रीकृष्णाची चैताली’ झाली सद्गुरूंच्या (टीप १) मार्गदर्शनामुळे ।
भगवंताने घेतले तुला चरणांपाशी तुझ्या तीव्र तळमळीमुळे ।। १ ।।

गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी ।
जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मिळाली तुला मुक्ती ।। २ ।।

तळमळीने केलेस तू साधनेचे प्रयत्न ।
पुष्कळ सुंदर आणि स्वच्छ आहे तुझे मन ।। ३ ।।

साधनेच्या प्रत्येक पायरीवर आल्या तुला पुष्कळ अडचणी ।
करतेस तू भगवंताला प्रार्थना सदैव मनोमनी ।। ४ ।।

तुझ्या जीवनात जोडलीस तू नाळ साधनेची ।
पुष्कळ कृतज्ञता आहे गुरुमाऊलींच्या चरणांसी ।। ५ ।।

तुझे निखळ हास्य पाहून मन आनंदून जाते ।
तू सगळ्यांवर पुष्कळ प्रेम करते ।। ६ ।।

सद्गुरुंच्या मार्गदर्शनामुळे मिळाला तुझ्या जीवनाला नवीन अर्थ ।
भगवंताने दिले तुला साधना करण्याचे सामर्थ्य ।। ७ ।।

टीप १ : सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

– कु. साक्षी रुद्रकंठावार (कु. चैताली हिची भाची (वय १८ वर्षे)), मानवत, परभणी. (२१.८.२०२०)