‘मुस्लिम पर्सनल लॉ’मुळे पौगंडावस्थेतील मुसलमान मुलगी स्वेच्छेने विवाह करू शकते ! – उच्च न्यायालय
१७ वर्षीय मुसलमान मुलीने केला हिंदु तरुणाशी विवाह !
चंडीगड – मुसलमान मुलीने पौगंडावस्थेत प्रवेश केल्यानंतर ‘मुस्लिम पर्सनल लॉ’मुळे ती स्वत:च्या इच्छेनुसार कुणाशीही विवाह करून शकते. यामध्ये तिचे आई-वडील किंवा नातेवाईक हस्तक्षेप करू शकत नाहीत, असा निकाल पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे. या वेळी न्यायालयाने कुटुंब आणि नातेवाईक यांच्या विरोधात जाऊन हिंदु मुलाशी विवाह करणार्या १७ वर्षीय अल्पवयीन मुसलमान मुलीला अन् तिच्या पतीला सुरक्षा पुरवण्याचे आदेशही दिले आहेत.
न्यायमूर्ती हरनरेश सिंह गिल यांनी म्हटले की, मुसलमान मुलीचा विवाह ‘मुस्लिम पर्सनल लॉ’द्वारे केला जातो, हा कायदा स्पष्ट आहे. सर दिनशाह फरदुनजी मुल्ला यांच्या ‘प्रिंसिपल्स ऑफ मोहम्मडन लॉ’ (महंमदी कायद्यातील तत्त्वे) नावाच्या पुस्तकातील कलम १९५ नुसार याचिकाकर्ता मुलगी १७ वर्षीय असल्याने ती तिच्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करण्यास सक्षम आहे. तसेच याचिकाकर्ता नवर्या मुलाचे वयसुद्धा ३३ वर्षे आहे. त्यामुळे याचिकाकर्ता मुलगी मुस्लिम पर्सनल लॉनुसार विवाहयोग्य वयाची आहे. केवळ याचिकाकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले; म्हणून त्यांना राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवता येणार नाही. याची भीती याचिकाकर्त्यांच्या मनातून घालवण्याची आवश्यकता आहे.