तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्वरित कारवाई केली असती, तर गोव्यातील सहस्रो स्वातंत्र्यसैनिकांना यातना भोगाव्या लागल्या नसत्या ! – नरेंद्र सावईकर, माजी खासदार

पणजी, २५ डिसेंबर (वार्ता.) – भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गोव्याला पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी त्वरित कारवाई केली असती, तर गोव्यातील सहस्रो स्वातंत्र्यसैनिकांना कारावास भोगावा लागला नसता किंवा त्यांना र्पोर्तुगीज पोलिसांकडून यातना भोगून प्राण गमवावे लागले नसते, असे विधान भाजपचे नेते तथा माजी खासदार अधिवक्ता नरेंद्र सावईकर यांनी ट्वीट करून केले आहे.

काँग्रेसचे दक्षिण गोव्यातील विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन

गोव्याच्या ६१ व्या मुक्तीदिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख टाळल्याच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे दक्षिण गोव्यातील विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी टीका केली आहे. या पार्श्‍वभूमीवर नरेंद्र सावईकर यांनी हे ट्वीट केले आहे.नेहरू

भाजपचे नेते तथा माजी खासदार अधिवक्ता नरेंद्र सावईकर

खासदार फ्रान्सिस सार्दिन म्हणाले होते की, गोवा मुक्तीलढ्यात माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांचे योगदान मोठे आहे. गोवा मुक्तीदिन सोहळ्यात त्यांचा उल्लेख केला नाही म्हणून इतिहास लपून रहात नाही. पंतप्रधान मोदी यांना काँगेस आणि नेहरू घराणे यांविषयी द्वेष असू शकतो; मात्र त्यामुळे इतिहास लपून रहाणार नाही. पंडित नेहरू यांनी सैन्याला पाठवून गोवा मुक्त केले, हे सर्वश्रुत आहे. (पंडित नेहरू यांनी गोव्यात सैन्य पाठवले, तरी ते सहस्रोंचे बळी गेल्यावर विलंबाने पाठवले. हा इतिहास सार्दिन यांना ज्ञात नसला, तरी तो लपून रहात नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे ! – संपादक)