‘हलाल’ प्रमाणपत्र व्यवस्था धर्मनिरपेक्ष भारतात बंद करा !
‘मलकापूर किराणा व्यापारी संघटने’चे शाहूवाडी नायब तहसीलदारांना निवेदन
मलकापूर, २५ डिसेंबर (वार्ता.) – सध्या मुसलमान धर्मियांकडून भारतात प्रत्येक वस्तू इस्लामनुसार वैध म्हणजे ‘हलाल’ असण्याची मागणी केली जात आहे. हिंदूबहुल भारतात हिंदूंवर ही बळजोरी करण्याचे कारण काय ? तरी धर्मनिरपेक्ष भारतात ‘हलाल’ प्रमाणपत्र व्यवस्था बंद करावी, या मागणीचे निवेदन मलकापूर किराणा व्यापारी संघटनेच्या वतीने शाहूवाडी नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांना देण्यात आले. या वेळी तहसीलदारांनी या संदर्भात अधिक माहिती घेऊन सदरचे निवेदन पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवत असल्याचे सांगितले. (‘हलाल’ प्रमाणपत्राच्या विरोधात भूमिका घेणार्या ‘मलकापूर किराणा व्यापारी संघटने’चे अभिनंदन ! प्रत्येक संघटनेने याप्रमाणे त्यांच्या स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक आहे ! – संपादक)
या वेळी व्यावसायिक श्री. चेतन शहा, श्री. महेश विभुते, सर्वश्री अशोक देशमाने, केतन गांधी, समीर धनलोभे, विजय गांधी, हिंदुत्वनिष्ठ श्री. चारुदत्त पोतदार, श्री. रोहित पास्ते, श्री. संजय चव्हाण, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी आणि श्री. सुधाकर मिरजकर, वैद्य संजय गांधी, श्री. आनंद लोंढे, श्री. जितेंद्र पंडित यांसह २७ जण उपस्थित होते.