ऑगस्ट २०२१ मध्ये ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळाला भेट देणार्या जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय
१. ‘एस्.एस्.आर्.एफ्.चे इंग्रजी फेसबूक’ पान
१ अ. ‘आधुनिक संगीत’ या ‘पोस्ट’ला मिळालेला अभिप्राय : मी ‘माझे सर्व छान चालू आहे’, अशा भ्रमात राहून माझ्याच विश्वात वावरत होते. आधुनिक संगीत ऐकतांना मला चांगले वाटत असे. काही कालावधीनंतर मी ‘मादक पदार्थ (ड्रग्ज्)’ घेऊ लागले आणि मनाची स्थिती चांगली ठेवण्यासाठी मला संगीतमय मेजवान्यांची आवश्यकता भासू लागली. या सर्व गोष्टींत मी इतकी अडकले की ‘अशा संगीत मेजवान्या (टेक्नो पार्टीज्) घरीही कराव्यात’, असे मला वाटू लागले. मी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ने सांगितलेली साधना करण्यास आरंभ केल्यावर माझे ‘ड्रग्ज्’ घेणे पूर्णतः बंद झाले. ‘संगीत मेजवान्यांची (‘टेक्नो पार्टीज्’ची) आता मला आवश्यकता भासत नाही. आता माझे भवितव्य उज्ज्वल होत आहे. देवाप्रती कृतज्ञता !’ – श्रीमती ल्युनिआ मा, जर्मनी
१ आ. ‘इतरांना क्षमा केल्याने साहाय्य होते’ या ‘पोस्ट’ला मिळालेला अभिप्राय : ‘माझ्या मनात बर्याच कालावधीपासून एका व्यक्तीविषयी राग आणि आकस होता अन् त्यावर माझे नियंत्रण रहात नव्हते. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळावर सांगण्यात आलेली साधना करतांना माझ्या मनातील त्या व्यक्तीविषयी असलेला राग हळूहळू न्यून झाला.’
– श्री. अनिर्बान मुखोपाध्याय
२. ‘एस्.एस्.आर्.एफ्.चे यू ट्यूब’ चॅनेल
२ अ. ‘मीठ-पाण्याचे उपाय’ या चलचित्राविषयी मिळालेले अभिप्राय
२ अ १. ‘मीठ-पाण्याचे उपाय’ केल्यावर काही घंट्यांनी शांत वाटणे आणि जीवनाविषयी आशावादी होणे : ‘बर्याच दिवसांपासून मला सतत शारीरिक वेदना होतात. कोरोना महामारीमुळे माझे शस्त्रकर्म पुढे ढकलले. त्यामुळे मी निराश आणि चिंताग्रस्त झाल्याने माझ्या मनात सतत मला जीवन संपवण्याचे विचार येत असत. ‘एस्.एस्.आर्.एफ्. यू ट्यूब’ वरील ‘मीठ-पाण्याचे उपाय’ हे चलचित्र पाहिल्यावर मी एकदा तसे उपाय केले. काही घंट्यांनंतर मला आतून शांत वाटू लागले, तसेच मी जीवनाविषयी आशावादीही झाले. तुम्हाला तुमच्या दुःखांपासून मुक्ती हवी असेल, तर कृपया तुम्ही हे उपाय करा आणि प्रार्थनाही करा. हे सर्व तुम्ही तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या आत्म्यासाठी करा आणि हे करतांना तुमचा जो निर्माता आहे, त्याच्या शक्तीवर विश्वास ठेवून करा. ‘तुम्हाला शांती मिळो’, अशी मी भगवंताला प्रार्थना करते. या सुंदर चलचित्रासाठी धन्यवाद !’ – एक जिज्ञासू, डेन्मार्क
२ अ २. मीठ-पाण्याचे उपाय केल्यावर हलकेपणा जाणवणे : ‘मी ३ – ४ वेळा मीठ-पाण्याचे उपाय केले. मला जाणवत असलेला जडपणा ‘मीठ-पाण्या’च्या उपायांनी न्यून होऊन मला हलकेपणा जाणवू लागला. पूर्वी माझ्या मुखावर हास्य नसायचे; परंतु ‘मीठ-पाण्या’चे उपाय केल्यानंतर आता माझ्या मुखावर हास्य असते. संपूर्ण जगासाठी हे चलचित्र उपलब्ध करून दिल्यामुळे धन्यवाद !’ – श्रीमती स्टेला फान
२ आ. ‘कर्म’ या चलचित्राविषयी मिळालेला अभिप्राय
२ आ १. ‘श्री गुरुदेव दत्त !’ हा नामजप करण्यास आरंभ केल्यापासून ईश्वराकडून आध्यात्मिक बळ मिळत आहे’, असे जाणवणे : ‘तुम्ही ‘कर्म’विषयी चांगली माहिती दिली आहे. मला ‘कलियुगात अध्यात्माविषयी कुणीतरी मार्गदर्शन करणारे आहे’, हे पाहून चांगले वाटले. मी ‘श्री गुरुदेव दत्त !’ हा नामजप करण्यास आरंभ केला आहे. मी नामजप करण्यास आरंभ केल्यापासून मला ईश्वराकडून आध्यात्मिक बळ मिळत असल्याचे जाणवत आहे. ‘जय गुरुदेव दत्त !’ – श्री. हेमंत पाटील
३. ‘एस्.एस्.आर्.एफ्. लॉग – इन’
३ अ. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळावरील ‘सात्त्विक केशरचना आणि दागिने’ हा लेख वाचल्यावर त्यात सांगितल्याप्रमाणे कृती करण्यास आरंभ केला ! : ‘या संकेतस्थळावरील ‘सात्त्विक केशरचना आणि दागिने’ हा लेख मी वाचला. या लेखातून मला पुष्कळ शिकायला मिळाले. लेख वाचल्यावर मी त्यात सांगितल्याप्रमाणे कृती करण्यास आरंभ केला आहे. केशरचना आणि दागिने यांविषयी माहिती दिल्यामुळे धन्यवाद ! संपूर्ण मानवतेसाठी तुम्ही (‘एस्.एस्.आर्.एफ्.’) अध्यात्मप्रसाराचे जे कार्य करत आहात, त्यासाठी पुष्कळ धन्यवाद !’ – सौ. प्रांजली कोळी, पुणे
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |