घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वी अधिक गतीने करायच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा आणि शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून घ्या !
१. ग्रंथसेवेच्या माध्यमातून साधना चांगली होण्यास साहाय्य होणे
‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सांगितले आहे, ‘घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वी अधिकाधिक ग्रंथांची निर्मिती करून त्याद्वारे समाजाला साधक बनवणे’, ही सध्याच्या काळातील श्रेष्ठ समष्टी साधना आहे !’ अशा प्रकारे परात्पर गुरु डॉक्टरांचा ग्रंथनिर्मितीचे कार्य अधिक गतीने करण्याच्या दृष्टीने एकप्रकारे अव्यक्त संकल्पच झालेला आहे. या थोर विभूतीच्या संकल्पाला अनुसरून आपण ग्रंथकार्य गतीने होण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले, तर त्या संकल्पाचे फळ आपल्याला मिळणार आहे, म्हणजेच आपली आध्यात्मिक उन्नती गतीने होणार आहे.
ग्रंथ सिद्ध करतांना संतांची चरित्रे आणि शिकवण, भक्तीयोग, साधना यांसारखे विषय वाचनात येतात. हे विषय मुळातच सात्त्विक आहेत. त्यामुळे ग्रंथसेवेच्या माध्यमातून सात्त्विकतेचा लाभ सहजगत्या होतो. तसेच ग्रंथसेवा करतांना अध्यात्मातील वेगवेगळे विषय वाचनात आल्याने सतत साधनेविषयी मार्गदर्शनही मिळते. या मार्गदर्शनाचा संस्कार आपल्या अंतःकरणावर सतत होत असल्यामुळे आपले साधनेविषयीचे दृष्टीकोन पक्के होतात. यामुळे आपली साधना चांगली होण्यास साहाय्य होते.
परात्पर गुरु डॉक्टर संकलन करत असलेल्या ग्रंथांपैकी ऑक्टोबर २०२१ पर्यंत ३४९ ग्रंथ-लघुग्रंथ यांची निर्मिती झाली आहे. अन्य अनुमाने ५ सहस्रांहून अधिक ग्रंथांच्या निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा अधिकाधिक लाभ करून घ्या !’
२. ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होण्यासाठी संपर्क करा !
वरील सर्व सेवांसाठी संगणकाचे जुजबी ज्ञान असणे, तसेच संगणकीय टंकलेखन करता येणे आवश्यक आहे. ग्रंथनिर्मितीशी संबंधित सेवा शिकण्यासाठी इच्छुकांना सनातनच्या आश्रमात २ – ३ आठवडे रहाता येईल. पुढे त्यांना सनातनच्या आश्रमात राहून किंवा घरी राहूनही सेवा करता येतील.
या सेवा करू इच्छिणार्यांनी पुढील सारणीनुसार आपली माहिती सनातनच्या साधकांना संगणकीय धारिकेच्या किंवा लिखित स्वरूपात द्यावी आणि साधकांनी ती माहिती आपल्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून सौ. भाग्यश्री सावंत यांच्या नावे sankalak.goa@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा पुढील टपाल पत्त्यावर पाठवावी.
टपालासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, रामनाथी, फोंडा, गोवा. पिन ४०३ ४०१.
– (पू.) संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक (२३.११.२०२१)