राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २६ .१२.२०२१
प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
सर्व माहिती मिळूनही संशयास्पद नौकांना पकडू न शकणारे पोलीस !
कुचकामी पोलीस !
‘देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील गिर्ये येथील समुद्रात चीनची ‘व्ही.टी.एस्.’ (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम) यंत्रणा असलेली नौका सापडली. चीनची यंत्रणा बसवलेली नौका सापडल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या; मात्र चौकशीअंती ही नौका भारतीय असल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला. या नौकेसमवेत असलेल्या अन्य २ नौका घेऊन खलाशी पळून गेले.’
‘हिंदू असणे ही धर्मनिरपेक्ष असण्याची सर्वांत मोठी हमी आहे. मी म्हणतो की, मी स्वत:ला ‘हिंदु सनातन’ मानतो, तर मला सांगा की, मी कोणती चूक करतो ? भारतात राहून धर्मनिरपेक्षतेविषयी बोलणे खूप सोपे आहे. अशा लोकांनी पाकिस्तानात जाऊन धर्मनिरपेक्षतेविषयी बोलावे, असे मला वाटते.’
– योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश. (दैनिक ‘लोकसत्ता’, १०.११.२०२१)
हे प्रशासनाला लज्जास्पद ! वर्ष १९९० मध्ये काश्मीरमधून पलायन कराव्या लागणार्या लाखो हिंदूंपैकी केवळ ९ काश्मिरी हिंदूंना त्यांची मालमत्ता परत मिळणे, ही स्थिती खेदजनक आहे. याचा अर्थ काश्मीरमध्ये अजूनही हिंदूंना सुरक्षित वातावरण निर्माण झालेले नाही. तेथील धर्मांध आणि जिहादी आतंकवादी यांचा निःपात केला, तरच तेथे हिंदूंना सुरक्षित वाटेल !
‘काश्मीरमधील विस्थापित हिंदूंची मालमता त्यांना पुन्हा मिळवून देण्यासाठी केंद्रशासन प्रयत्न करत आहे. त्यातील काही जणांना मालमत्ताही परत देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ९ काश्मिरी हिंदूंना त्यांची मालमत्ता परत देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रशासनाने राज्यसभेत दिली.’
दंगलीला ९ वर्षे पूर्ण होऊनही न्याय न मिळणे, हे आहे लज्जास्पद लोकशाहीचे एक उदाहरण !
‘११.८.२०१२ या दिवशी मुंबईतील आझाद मैदानात धर्मांधांनी केलेल्या दंगलीला आता ९ वर्षे पूर्ण झाली. या दंगलीमध्ये महिला पोलिसांचा विनयभंग करण्यात आला होता. या दंगलीचा खटला न्यायालयात चालू आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेले सर्व ६० आरोपी जामिनावर मुक्त झाले असून पोलीस मात्र अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.’
अशा संवेदनशील ठिकाणी धर्मांधांना प्रवेश देण्यात येऊ नये, हे सैन्याच्या लक्षात कसे येत नाही ? सैन्याने आतातरी आत्मघातकी सर्वधर्मसमभाव बाजूला ठेवावा !
‘पोखरण (राजस्थान) येथे सैन्यतळाला भाजी पुरवणार्या हबीब खान या ३४ वर्षीय व्यक्तीला हेरगिरी केल्याच्या प्रकरणी देहली पोलिसांनी अटक केली. हबीब खान पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ला गोपनीय माहिती पुरवत होता. त्याच्याकडून अत्यंत गोपनीय कागदपत्रे आणि सैन्यतळाचे रेखाचित्र जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आगरा येथे तैनात असलेल्या परमजित कौर या सैनिकाने हबीब याला ही कागदपत्रे मिळवून दिल्याचे समोर आले आहे. हबीब ही माहिती कमल नावाच्या व्यक्तीकडे पाठवत होता.’
अमेरिकेत हिंदूंवर वांशिक आक्रमणे वाढण्याच्या शक्यतेमुळे आतातरी केंद्र सरकार यात लक्ष घालून जगभरातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी पावले उचलणार का ? भारतातील हिंदूंचे रक्षण करू न शकणारे सर्वपक्षीय शासनकर्ते जगातील हिंदूंचे रक्षण कधीतरी करतील का ?
‘अमेरिकेतील साम्यवाद्यांकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (जागतिक स्तरावरील हिंदुत्वाचे उच्चाटन) या परिषदेद्वारे हिंदूंच्या विरोधात द्वेष पसरवण्यात आल्यामुळे अमेरिकेतील हिंदूंवरील वांशिक आक्रमणे वाढतील, अशी भीती तेथे रहाणार्या हिंदूंना वाटत आहे, असे समोर आले आहे.’
खोटे बोलणार्या अधिवक्त्यांनाही शिक्षा केली पाहिजे !
‘मुंबईमध्ये अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणे, तिला डोळा मारणे आणि पैशांचे आमीष दाखवून तिला जवळ बोलावणार्या २८ वर्षांच्या युवकाला विशेष ‘पॉक्सो’ न्यायालयाने ४ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. दोषी युवक आतापर्यंत ४ वर्षे कारागृहात असल्यामुळे न्यायालयाने त्याला आणखी ३ दिवसांची साधी शिक्षा ठोठावली आहे. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पूर्ववैमनस्यातून आरोपीला गोवल्याचे आरोपीच्या अधिवक्त्याने न्यायालयात म्हटले; मात्र त्याविषयी कोणतेही ठोस पुरावे त्यांना न्यायालयात सादर करता आले नाहीत.’
गुणवत्तेला नाही, तर जातीला महत्त्व देणारे लोकप्रतिनिधी आणि जात्यंध !
‘कोणत्याही न्यायालयाच्या निकालपत्रापेक्षा देशाची राज्यघटना श्रेष्ठ आहे. राज्यघटनेत आरक्षणाच्या कमाल मर्यादेची अट ठेवण्यात आलेली नाही. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची परिणामक्षमता न्यून करत ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करून आरक्षणाची मर्यादा वाढवता येऊ शकेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केले.’
‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी केलेले अत्याचार यांच्या या आठवड्यात झालेल्या घटना
- अमरोहा (उत्तरप्रदेश) मध्ये लव्ह जिहादची घटना ! – धर्मांधाने ‘मनीष’ बनून हिंदु विद्यार्थिनीला फसवले आणि बलपूर्वक धर्मांतर करून लग्न केल्यावर सोडले !
- लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे धर्मांधाने ‘विशाल’ नावाने हिंदु युवतीचे शारीरिक शोषण करून अडीच लाख रुपये हडपले !
- रायपूरमध्ये (छत्तीसगड) धर्मांधांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
- मेरठ (उत्तरप्रदेश) येथे भाजप महिला मोर्चाच्या महिला नेत्यावर धर्मांधांकडून सामूहिक बलात्कार – मेरठमध्ये तणाव !