केरळमधील मंत्र्याच्या कार्यालयातील प्रसाधनगृहाच्या बांधकामावर ४ लाख रुपये व्यय करण्यास साम्यवादी सरकारची संमती !
जनतेच्या पैशांची लूट करणारे साम्यवादी सरकार ! असा पक्ष सत्तेवर असल्यास जनहित काय साधले जाणार ? – संपादक
कोच्ची – केरळ राज्याचे मत्स्योद्योग मंत्री साजी चेरियन यांच्या कार्यालयातील प्रसाधनगृहाच्या बांधकामावर ४ लाख १० सहस्र रुपये व्यय करण्यात आले आहेत. सामान्य प्रशासन खात्याकडून वरील माहिती उघड झाल्यावर सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. विशेष म्हणजे केरळ सरकारच्या घरकुल योजनेच्या अंतर्गत गरिबांना घर बांधकामासाठी ४ लाख रुपये संमत केले जातात आणि मंत्र्यांच्या कार्यालयातील प्रसाधनगृहाचा व्यय मात्र घरकुलांच्या व्ययापेक्षा अधिक असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (गरिबांना घर बांधण्यासाठी ४ लाख रुपये, तर मंत्र्यांना प्रसाधनगृह बांधण्यासाठी ४ लाख १० सहस्र रुपये संमत करणे, हाच साम्यवादी सरकारचा साम्यवाद का ? – संपादक) केरळ राज्य सध्याच्या घडीला आर्थिक संकटातून जात असताना मंत्र्याच्या कार्यालयातील प्रसाधनगृहावर एवढा खर्च केल्याने याविषयीची चर्चा होत आहे.
#केरल सरकार की ओर से एक मंत्री के कार्यालय में एक नए शौचालय के लिए 4.10 लाख रुपये की मंजूरी देने के बाद सियासी हलचल तेज हो गई है। केरल सरकार ‘जीवन मिशन परियोजना’ के तहत गरीबों के लिए एक घर बनाने के लिए केवल 4 लाख रुपये का अनुदान देती है।@SajiCherian11 pic.twitter.com/t7F2RqqhSF
— IANS Hindi (@IANSKhabar) December 24, 2021