आसाममध्ये गोतस्करांची संपत्ती जप्त करणारे विधेयक संमत !
गोहत्या आणि गोतस्करी यांच्या संदर्भात केंद्र सरकारने कठोर कायदा केला, तर देशातील राज्यांना वेगवेगळा कायदा करण्याची आवश्यकता भासणार नाही ! केंद्र सरकारने असा कायदा लवकरात लवकर करावा, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक
गौहत्ती (आसाम) – आसामच्या भाजप सरकारने प्राण्यांविषयीच्या एका कायद्यामध्ये सुधारणा करणारे विधेयक संमत केले आहे. या विधेयकामुळे आता गोतस्कराच्या घरात प्रवेश करून शोध घेण्यासह गेल्या ६ वर्षांत त्याने अवैध पशू व्यापारातून मिळवलेली संपत्ती जप्त करण्याचाही अधिकार पोलिसांना देण्यात आला आहे. तसेच गोतस्करांकडून जप्त केलेल्या वाहनांचा आता लिलाव करता येणार आहे. यापूर्वीच ऑगस्ट मासामध्येही या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक संमत करण्यात आले होते. त्यात हिंदु, शीख आणि जैन धर्मियांच्या प्रार्थनास्थळांपासून ५ किलोमीटर परिसरात गोहत्या अन् गोमांस विक्री यांवर बंदी घालण्यात आली होती.
Assam assembly allows seizure of properties of those accused of illegal cow trade https://t.co/zT5cZ91CVt
— Hindustan Times (@HindustanTimes) December 23, 2021