देहली येथे धर्मांधांच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत एक हिंदु तरुणाचा मृत्यू
|
नवी देहली – येथील संगम विहारमध्ये जतिन आणि पंकज या हिंदु तरुणांवर ७-८ धर्मांधांच्या टोळक्याने केलेल्या आक्रमणात जतिन याचा मृत्यू झाल्याची घटना २० डिसेंबरच्या रात्री घडली. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी रमजान नावाच्या तरुणासह आणखी एकाला अटक केली असून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. ही घटना चोरीच्या उद्देशाने झाली होती. जतिन आणि पंकज रात्री घरी परतत असतांना ही घटना घडली. या टोळक्याने त्यांच्याकडून ३ सहस्र रुपये लुटले आणि त्यांना मारहाण करून बेशुद्ध झाल्यावर त्यांना नाल्यात फेकून दिले. यात जतिनचा मृत्यू झाला.
#CaughtOnCam: Youth killed for resisting robbery bid at Sangam Vihar in Delhi#robbery #Delhi pic.twitter.com/gWRmi3W94y
— DNA (@dna) December 24, 2021