आनंदी, इतरांना समजून घेणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले अन् सर्व साधक यांच्याप्रती भाव असणार्‍या श्रीमती श्यामला दादाजी देशमुख !

आनंदी, इतरांना समजून घेणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले अन् सर्व साधक यांच्याप्रती भाव असणार्‍या नाशिक येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती श्यामला दादाजी देशमुख (वय ५८ वर्षे) !

उद्या मार्गशीर्ष कृष्ण पक्ष सप्तमी (२६.१२.२०२१) या दिवशी नाशिक येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती श्यामला दादाजी देशमुख यांचा वाढदिवस आहे. त्या हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या सासूबाई (पत्नीची आई) आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीमती देशमुख यांच्या नातेवाइकांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

श्रीमती श्यामला देशमुख

श्रीमती श्यामला दादाजी देशमुख यांना ५८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर (मोठी मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. निरागस : ‘आई हसतांना लहान मुलासारखी निरागस दिसते.

२. मुलीला तिच्यातील पालट सांगून सकारात्मक अन् शिकण्याच्या स्थितीत रहायला सांगणे : कधी मला काही जमत नसल्याचे मी तिला सांगितल्यावर ती मला नेहमी सकारात्मक रहायला आणि नवीन गोष्टी शिकून घ्यायला सांगते. माझे स्वतःविषयीचे नकारात्मक विचार मी तिला सांगितल्यावर ती मला माझ्यात आतापर्यंत झालेले पालट आणि मी केलेले प्रयत्न यांची आठवण करून देते. त्यामुळे माझी नकारात्मकता जाऊन माझ्या मनाला उभारी मिळते.

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर

३. अलिप्तता : आईने आतापर्यंत कधीच आम्हा कुटुंबियांवर तिचे मत लादले नाही. माझे यजमान (अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर) मला नेहमी म्हणतात, ‘‘आई सर्वांमध्ये असूनही अलिप्त असतात.’’ आई सर्वांच्या मतांचा आदर करते. ती आम्हाला ‘योग्य-अयोग्य’ याविषयी सांगते आणि आम्हाला निर्णय घेण्यास सांगते. त्यामुळे आमच्यात निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते.

४. इतरांना समजून घेणे : आईने सौ. शिवानीच्या (सुनेच्या) कलाने घेऊन तिला घरातील सर्व गोष्टी शिकवल्या. ती तिला साधनेविषयीही सांगते. त्यामुळे शिवानीला आईच्या सहवासात रहायला आवडते.

५. आईच्या संदर्भात एका साधिकेला आलेली अनुभूती

५ अ. आईशी बोलल्यावर खोलीत रहाणार्‍या साधिकेच्या पायांत होणार्‍या वेदना थांबणे : माझ्या खोलीतील एका साधिकेला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. एकदा आईचा मला भ्रमणभाष आला होता. त्या वेळी ती साधिका आईशी ५ मिनिटे बोलली. आईशी बोलण्यापूर्वी तिच्या पायांत पुष्कळ वेदना होत होत्या. त्यामुळे ती तिचे पाय भूमीवर टेकवू शकत नव्हती कि चालू शकत नव्हती. ती आईशी बोलत असतांना तिच्या पायांत होणार्‍या वेदना पूर्णपणे थांबल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर ती काही वेळ खोलीत चालू शकली.’

श्री. अमोल देशमुख आणि सौ. शिवानी अमोल देशमुख

श्री. अमोल देशमुख (मुलगा), नाशिक

१. सेवेची तळमळ : ‘आईला सांगितलेली कोणतीही सेवा ती रात्री जागून किंवा पहाटे लवकर उठून पूर्ण करते. दळणवळण बंदीच्या काळात तिने भ्रमणभाषमधील ‘व्हॉट्स ॲप’, ‘टेलिग्राम’ इत्यादी शिकून घेतले. तिला देवाची सेवा करायची असल्याने ती चिकाटीने सगळे शिकली.

२. प्रत्येक प्रसंगात प्रोत्साहन देणे : घरी चांगला किंवा वाईट कसाही प्रसंग घडला, तरी आई नेहमीच आमच्या पाठीशी उभी रहाते. ती आम्हाला प्रोत्साहन देते. प्रत्येक कार्यात तिचे आशीर्वाद आमच्या समवेत असतात. आमच्यासाठी ‘आई’ हेच आमचे दैवत आहे.

३. प्रेमभाव : ती केवळ कुटुंबीय आणि साधक यांच्याशीच नाही, तर ओळखीच्या किंवा अनोळखी लोकांशीही प्रेमाने वागते. अनोळखी लोकही तिच्याशी पहिल्या भेटीतच मनमोकळेपणाने बोलतात. ते तिला त्यांच्या अडचणी आणि त्यांच्या मनातील प्रसंग सांगतात. समोरची व्यक्ती तिच्याशी कशीही वागू दे, आई तिच्याशी प्रेमानेच वागते.

४. परात्पर गुरु डॉक्टर आठवले, संत आणि साधक यांच्या प्रती भाव : तिच्या मनात ‘परात्पर गुरु डॉक्टर, संत आणि साधक’, या सर्वांप्रती पुष्कळ भाव आहे. ते जे सांगतील, ते ती झोकून देऊन आणि मनापासून करते. ते करतांना तिच्या मनात कोणतीही शंका येत नाही.’

सौ. शिवानी अमोल देशमुख (सून), नाशिक

१. हसतमुख आणि आनंदी : ‘आई (सासूबाई) नेहमी हसतमुख आणि आनंदी असतात. मी त्यांना कधीही उदास पाहिलेले नाही. त्यांच्याकडे पाहून नेहमी चांगले वाटते. आई त्यांच्या वयाच्या मानाने तरुण दिसतात. त्या नेहमी हसतमुख असल्याने ‘त्यांच्याकडे पहात रहावे’, असे वाटते.

२. चांगले शरीरस्वास्थ्य : त्यांना या वयातही कोणतेही आजार नाहीत. त्या स्वतःची काळजी घेऊन सर्व करतात.

३. प्रोत्साहन देणे : आई आम्हाला कधीच कोणतीही चांगली कृती करण्यापासून परावृत्त करत नाहीत. आमच्याकडून काही कृती होत नसेल, तर त्या आम्हाला प्रोत्साहन देतात.

४. सुनेला आईची माया देणे : माझ्यासाठी या घरातील वातावरण नवीन आहे. त्यांनी मला मी जशी आहे, तसे स्वीकारले आहे. माझ्या यजमानांच्या आई आणि माझी आई यांच्यात मला भेद जाणवत नाही. ‘मी माहेर सोडून सासरी आले आहे किंवा मला इथे जुळवून घ्यायला वेळ लागत आहे’, असे मला वाटतच नाही. माझी सर्वांत अधिक जवळीक आईंशी (सासूबाईंशी) झाली आहे. माझ्यासाठी माझ्या सासूबाई सर्वांत चांगल्या आहेत.

५. प्रत्येक कृती तळमळीने करणे : आई त्यांचे प्रत्येक काम आणि कृती यांच्याशी प्रामाणिक अन् एकनिष्ठ आहेत. त्या प्रत्येक कृती पुष्कळ तळमळीने करतात. त्या घरातील आणि बाहेरची सर्व कामे करतात. त्यांना कोणतेही काम करण्याची भीती वाटत नाही.’

सौ. दुर्गेशा रणजित लोखंडे (मोठ्या मुलीची नणंद), कोल्हापूर

१. नम्रता : ‘श्रीमती देशमुखकाकू नम्रतेने बोलतात.

२. स्थिर : सौ. सावित्रीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर १० दिवसांनी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्या प्रसंगातही काकू अतिशय स्थिर होत्या. ‘त्यांनी तो कठीण प्रसंग संयमाने स्वीकारला’, असे मला जाणवले. काही मासांपूर्वी काकूंच्या आईचे निधन झाले. त्या वेळीही काकू अतिशय स्थिर होत्या. या दोन्ही प्रसंगांतून ‘त्यांना मायेतील ओढ अल्प आहे’, हे लक्षात येते.

३. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता : त्यांनी मला माझ्या आजारपणात गाईच्या शेणात गोमूत्र, हळद आणि कापूर घालून केलेल्या गोळ्यांनी दृष्ट काढायला सांगितले होते. मी तसे केल्यानंतर मला ८ दिवस असलेली अस्वस्थता न्यून झाली. यातून त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता लक्षात येते.

‘त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊन त्या लवकर संतपदी जावोत’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना आहे.’

सौ. भाग्यश्री प्रमोद देशमाने (मोठ्या मुलीची नणंद), कराड

करिती त्या ‘श्यामला’ नाव सार्थक ।

सहजता, सहृदयता अन् विनम्रता ।
हीच देशमुखकाकूंची विशेषता ।। १ ।।

मृदु भाषण, सुहास्य वदन, अल्प अहं ।
अन् सदैव सर्व स्वीकारण्याची तत्परता ।। २ ।।

वृक्ष भासती ऋषी त्यांना । वाटे सर्वांपरी ममता ।
बांधले जिव्हाळ्याच्या धाग्यांनी सर्वांना ।। ३ ।।

अंतरी आहे सतत स्थिरता । संगती सखा श्रीकृष्ण त्यांच्या ।
करिती त्या ‘श्यामला’ नाव सार्थक ।। ४ ।।

(सर्व सूत्रांचा दिनांक ६.६.२०२१)

कु. सुप्रिया शरद नवरंगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

प्रेमभावाने साधकांशी जवळीक साधणे : ‘काकूंमध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. ‘काकूंशी माझे पुष्कळ बोलणे होते किंवा त्यांच्याशी माझा पुष्कळ संपर्क आला आहे’, असे नाही. काकूंच्या मुली सौ. सावित्री इचलकरंजीकर आणि सौ. निशिगंधा नाफडे रामनाथी आश्रमात सेवा करतात. आम्ही एकमेकींना ओळखतो. काकू मला जेव्हा त्यांच्या घरी बोलवतात, त्या वेळी केवळ त्यांच्यातील प्रेमभावामुळे माझ्यासारख्या तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेला ‘आपण त्यांच्या घरी जाऊन हक्काने राहू शकतो’, असा विश्वास वाटतो.’ (६.६.२०२१)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक