बनावट संकेतस्थळाद्वारे अपात्र उमेदवारांचे निकाल घोषित करून पैसे उकळले !

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अपव्यवहार प्रकरण

अशांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे ! – संपादक 

पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अपव्यवहार प्रकरणातील आरोपी आणि परीक्षा परिषेदेचे निलंबित आयुक्त तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांनी ‘जी.ए. सॉफ्टवेअर’चे संचालक डॉ. प्रीतीश देशमुख यांच्याशी हातमिळवणी केली. त्यांनी बनावट संकेतस्थळ सिद्ध करून अपात्र उमेदवारांचे निकाल घोषित करत पैसे उकळले, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली आहे. चौकशीत सावरीकर उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, तर सुपे यांनी त्यांचे नातेवाईक आणि परिचित यांच्याकडे काही रक्कम दिल्याचे निष्पन्न झाले आहे. न्यायालयाने दोघांची पोलीस कोठडी ३० डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.

सुपे यांच्या कार्यालयातील इतर कुणी साथीदारांनी आरोपीला साहाय्य केले आहे का ? तसेच राज्यातील एजंट, अकादमीचालक यांनी साहाय्य केले का ? याचीही पडताळणी केली जात आहे. आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली आहे.