श्री. श्याम देशमुख आणि सौ. क्षिप्रा देशमुख यांना नामजप करतांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. श्याम देशमुख आणि ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. क्षिप्रा देशमुख यांना नामजप करतांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
१.‘ॐ निर्विचार ।’ हा नामजप केल्यावर मन लवकर निर्विचार होणे : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्यानुसार ‘एकूण नामजपाच्या वेळेपैकी २० टक्के वेळ ‘निर्विचार’ हा नामजप केल्यावर मन लवकर निर्विचार होते. मी विचार केला, ‘नवीन नामजप आहे, तर मन एकाग्र करण्यासाठी वेळ लागेल आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील’; परंतु ‘ॐ निर्विचार ।’ हा जप केल्यावर ‘त्या शब्दांमधून बाण निघत आहेत आणि मनात जेथे विचारांची केंद्रे आहेत, तेथे ते बाण लागत आहेत. ते बाण त्या विचारांच्या केंद्रांना नष्ट करत आहेत’, असे मला वाटले. ‘माझ्या मनावर केवळ ‘निर्विचार’चेच अधिपत्य आहे. तेथे अन्य कोणताही विचार राहूच शकत नाही. त्यांचे मुळीच अस्तित्व नाही’, असे मला वाटत होते.’
– सौ. क्षिप्रा श्याम देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०२१)
२. समष्टीसाठी नामजप केल्यावर आनंदात वाढ झाल्याची अनुभूती येणे : ‘व्यष्टी नामजपाच्या तुलनेत समष्टीसाठी नामजप करतांना मला अधिक आनंद मिळतो. प्रतिदिन समष्टीसाठी नामजप करण्याच्या सेवेची मी प्रतीक्षा करतो. (‘प्रतिदिन विशिष्ट उद्देशाने साधकांना वेगवेगळा नामजप करण्यासाठी कळवले जाते.’ – संकलक) समष्टीसाठी नामजप करण्याचा निरोप मिळताच ‘शीघ्रातीशीघ्र, अधिकाधिक आणि भावपूर्णरित्या तो नामजप केला पाहिजे’, असा विचार माझ्या मनात येतो. नामजप करतांना माझ्याकडून काही चूक झाली, तर ती मी नामजपाच्या शेवटी ईश्वराला मानस निवेदन करून सांगतो. ‘मी ज्या साधकासाठी नामजप करत आहे, त्यांना या नामजपाचा अधिकाधिक लाभ व्हावा’, असा विचार माझ्या मनात असतो.’
– श्री. श्याम देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |