पुण्यात वर्तमानपत्रामध्ये गरम पदार्थ बांधून दिल्यास दंडात्मक कारवाई !
पुणे – पुण्यात आता वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर गरम खाद्यपदार्थ ‘पॅकिंग’ करण्यासाठी करता येणार नाही. वर्तमानपत्र छापण्यासाठी वापरण्यात येणार्या शाईत ‘डायआयब्युटाइल फटालेट’ आणि ‘डायइन आयसोब्युटाईल’ हे रसायन असल्याने गरम खाद्यपदार्थांच्या संपर्कात आल्यावर हे रसायन विरघळते आणि ते आरोग्यास अत्यंत घातक आहे. ही शाई पोटात गेल्यास पचनक्रियेत बिघाड होऊ शकतो, तसेच पोटाचे अनेक विकारही जडू शकतात. त्यामुळे हॉटेलचालक आणि दुकानदार यांनी असे गरम पदार्थ वर्तमानपत्रात बांधून दिल्याचे आढळून आल्यास अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या वतीने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.