आर्थिक अडचणी असूनही ‘सनातन पंचांगा’ला विज्ञापन दिल्यानंतर प्रलंबित न्यायालयीन खटल्याचा निकाल लागून सरकारकडून आर्थिक हानीभरपाई मिळणे
१. कर्ज झाल्यामुळे केवळ ‘सनातन पंचांगां’च्या विज्ञापनाचा अर्ज भरून देणे आणि साधकांना देयक घेण्यासाठी पुढच्या मासात येण्याची विनंती करणे
‘१६.११.२०१९ या दिवशी सनातनच्या साधकांशी ‘साधनेचे महत्त्व आणि धनाचा त्याग’ यांविषयी चर्चा झाली. तेव्हा ‘सनातन पंचांग २०२१’ साठी विज्ञापन द्यावे’, असा विचार देवाने आम्हाला दिला. बांधकाम करण्यासाठी पुष्कळ कर्ज काढावे लागल्याने त्या वेळी माझ्याकडे पैसे नव्हते, तरीही त्या दिवशी मी विज्ञापनाचा अर्ज भरून दिला आणि रक्कम घेण्यासाठी १५ डिसेंबरला येण्याची त्यांना विनंती केली.
२. प्रलंबित खटल्याचा निकाल लागून हानीभरपाई मिळाल्यामुळे पंचांगाच्या विज्ञापनाचा धनादेश देता येणे
गेल्या ६ वर्षांपासून माझे शासनाकडून पैसे येणे असूनही ते पैसे मला मिळत नव्हते. निकालासाठी सतत पुढील दिनांक मिळत असल्याने ते पैसे येण्याची आशा आम्ही सोडून दिली होती. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने १.१२.२०१९ या दिवशी न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागला आणि न्यायालयाने आमची १० लक्ष रुपयांची हानी भरून देण्याचा आदेश सरकारी पक्षाला दिला. त्याचा पहिला हप्ता १२.१२.२०१९ या दिवशी आम्हाला मिळाला आणि १३.१२.२०१९ या दिवशी साधकांना पंचांगासाठी दिलेल्या विज्ञापनाचा धनादेश मी देऊ शकलो. ही सर्व भगवान श्रीकृष्णाचीच कृपा आहे.’
– श्री. मधुकर मुरलीधर नाईक आणि सौ. मीरा मधुकर नाईक, बार्शी, जिल्हा सोलापूर. (१३.१२.२०१९)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |