(म्हणे) ‘सध्याचे सरकार देशाला सांप्रदायिक बनवत असून लोकांमध्ये फूट पाडत आहे !’ – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला

काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांचे सरकार असतांना त्यांनी हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडणार्‍यांपैकी किती जणांवर कारवाई करून त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले ? पलायन केलेल्या किती हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन केले ? काश्मीरमधील धर्मांध हे ‘धर्मनिरपेक्ष’ नसून ते धर्मांध वृत्तीचे असल्याने अजूनही हिंदू काश्मीरमध्ये राहू शकत नाहीत. याविषयी अब्दुल्ला का बोलत नाहीत ? – संपादक

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – भारत धर्मांध होत चालला आहे का ?, हा प्रश्‍न आहे. आधी देश धर्मनिरपेक्ष होता. सध्याचे सरकार देशाला धर्मांध बनवत असून लोकांमध्ये फूट पाडत आहे, असे फुकाचे विधान जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. ‘काश्मीरमधील स्थिती ज्वालामुखीसारखी असून तेथे कधीही स्फोट होऊ शकतो. या स्फोटाचा संपूर्ण देशावर परिणाम होणार असून त्यातून कुणीच वाचणार नाही’, असा दावाही त्यांनी या वेळी केला.