उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री यांना शिवीगाळ केल्यावरून पक्षाच्या महामंत्र्यास रावत समर्थकांकडून मारहाण !
स्वतःच्या पक्षाच्या पदाधिकार्यास मारहाण करणारे कार्यकर्ते असणारा पक्ष कधीतरी कायद्याचे राज्य देईल का ? – संपादक
डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडातील काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री हरिश रावत काँग्रेसवर अप्रसन्न आहेत. या पार्श्वभूमीवर येथील काँग्रेसच्या कार्यालयामध्ये रावत यांचे समर्थक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यात हाणामारी झाली. ‘राज्याचे काँग्रेसचे महामंत्री राजेंद्र शहा यांनी हरिश रावत यांना शिवीगाळ केली’, असा आरोप करत त्यांना रावत समर्थकांनी मारहाण केली.
उत्तराखंड: पूर्व सीएम हरीश रावत के लिए अपशब्द कहने पर कांग्रेस भवन में हंगामा, मारपीट; खुलकर सतह पर आ रही कलह@harishrawatcmuk #UttarakhandPolitics #HarishRawat #Congress https://t.co/BteYi6jBD7
— Dainik Jagran (@JagranNews) December 24, 2021