सनातनच्या सत्संगात आनंद जाणवण्याचे कारण !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !
‘एखाद्या संप्रदायाच्या संतांचे मार्गदर्शन, दर्शनसोहळा असला की, त्यांच्याकडे येणारे भक्त केवळ त्यांच्या आर्थिक, सांसारिक, शारीरिक आणि मानसिक या स्तरांवरील अडचणी मांडतात. आध्यात्मिक दृष्टीकोनातून बघितल्यास मनुष्याचे हे सर्व त्रास त्याच्या प्रारब्धानुसार असतात. यामुळे सनातनमध्ये प्रारब्धावर मात करण्यासाठी किंवा प्रारब्ध तीव्र असल्यास ते सहन करण्यासाठी योग्य अशी साधना शिकवली जाते. सनातनचे साधक निष्काम साधना करत आहेत. सनातनच्या सत्संगांमध्ये साधक त्यांना आलेल्या केवळ आध्यात्मिक स्तरावरील अनुभूती सांगतात. त्यामुळे सनातनच्या सत्संगांमध्ये साधकांना आनंद अनुभवता येतो.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२७.११.२०२१)