‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या देशविघातक संघटनेवर भारतात बंदी घाला !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन सादर

मध्यभागी उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

सोलापूर, २३ डिसेंबर (वार्ता.) – वर्ष २००६ मध्ये केरळ येथे स्थापन झालेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या संघटनेचे जाळे आता देशभरात पसरले आहे. ही संघटना अत्यंत जहाल असून अनेक देश आणि समाजविघातक कार्यात गुंतलेली असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. ही संघटना देशातील धार्मिक सलोखा आणि सामाजिक शांतता यांसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे देशाची सुरक्षितता आणि धार्मिक सलोखा टिकवण्यासाठी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर भारतात बंदी घालण्यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले. हे निवेदन महसूल उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी स्वीकारले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री अविनाश मदनावाले, ओम जगताप, अभिषेक नागराळे, सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी आणि समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)

निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या…

१. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या सर्व पदाधिकार्‍यांवर देशद्रोह आणि आतंकवादी कारवायांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल गुन्हे नोंद करून त्यांना अटक करावी.

२. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या सर्व कार्यालयांना टाळे ठोकून त्यांची सर्व बँक खाती गोठवण्यात यावीत.

३. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची सखोल चौकशी करून त्यांचे कोणकोणत्या आतंकवादी संघटनांशी संबंध आहेत, त्यांना विदेशातून मिळणारा निधी, त्यांची आगामी षड्यंत्रे आदींचा शोध घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.