कळंबा कारागृहाच्या वतीने नाताळ खरेदी मेळावा !
निधर्मी शासन प्रणालीत यापेक्षा वेगळी ती अपेक्षा काय ठेवणार ? – संपादक
कोल्हापूर, २२ डिसेंबर – दिवाळी मेळाव्यानंतर कळंबा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने १९ डिसेंबर या दिवशी नाताळ खरेदी मेळाव्याचे आयोजन केले होते. महाराष्ट्रात नाताळ खरेदी मेळावा आयोजित करणारे कळंबा मध्यवर्ती कारागृह एकमेव आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने कारागृहातील बंदीवानांनी सिद्ध केलेल्या ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, मेणबत्ती, विविध प्रकारचे केक, येशू आणि मेरी यांच्या छोट्या-मोठ्या मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. दिवाळी मेळाव्याला जेवढा प्रतिसाद मिळाला, तेवढा प्रतिसाद ‘नाताळ खरेदी’ मेळाव्याला मिळाला नाही, असे समजते. (भारत हा हिंदुबहुल देश आहे ! त्यामुळे दिवाळी मेळाव्याचे आयोजन करणे योग्यच आहे; मात्र संख्येने अत्यंत अल्प असलेल्या ख्रिस्त्यांसाठी कारागृह प्रशासनाचा आटापिटा कशासाठी ? हिंदु बंदीवानांना अन्य धर्मियांच्या वस्तू सिद्ध करण्याची ही एकप्रकारे केलेली बळजोरीच असून ते एक प्रकारचे वैचारिक धर्मांतरच नव्हे काय ? – संपादक)