ध्यानाच्या वेळी नामजप करतांना बारामती येथील सौ. गौरी जोशी यांना सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !

सौ. गौरी अ. जोशी

‘एकदा मी सकाळी ९.३० वाजता डोळे बंद करून नामजप करत होते. तेव्हा मला सूक्ष्मातून पुढील दृश्य दिसले.

१. ‘सर्व ऋषि-मुनी आणि दिव्यात्मे नामजप करत आहेत.

२. भगवान शिव नामजप करत आहे आणि त्याच्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य नामजप करणार्‍या सर्व साधकांकडे जात आहे.

३. श्री दुर्गादेवी नामजप करत आहे आणि तिच्याकडून प्र क्षेपित होणारे चैतन्य साधकांकडे जात आहे.

४. नंतर मारुतिरायाने त्याची गदा साधकांचे रक्षण होण्यासाठी वायूमंडलात सोडली. ती गदा प्रचंड मोठी होती. ती गदा ‘कोरोना’चे विषाणू नष्ट करण्यासाठी, म्हणजे अनिष्ट शक्तींनी सोडलेली त्रासदायक शक्ती नष्ट करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘अनिष्ट शक्तींनी कोरोनाच्या माध्यमातून साधक आणि सज्जन यांना त्रास देऊ नये’, यासाठी ती गदा अनिष्ट शक्तींशी लढत आहे.’ (त्या वेळी मला जाणवले, ‘कोरोनाचे विषाणू, म्हणजे अनिष्ट शक्तींनी सोडलेली त्रासदायक शक्ती आहे. आपण साधना केली, तरच आपले अनिष्ट शक्तींपासून रक्षण होऊ शकते.’)

‘परात्पर गुरुदेवांनी मला या अनुभूती दिल्या’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– सौ. गौरी अ. जोशी, बारामती, पुणे. (१५.३.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक