सनातन संस्थेच्या वतीने दत्तजयंतीनिमित्त केरळमध्ये आयोजित केलेल्या दत्ताच्या ‘ऑनलाईन’ नामजपाच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती

२९.१२.२०२० या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने दत्तजयंतीनिमित्त मल्याळम् आणि हिंदी भाषिक लोकांसाठी दत्ताचा ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजप आयोजित केला होता. त्या निमित्त केरळ येथील साधकांनी जिज्ञासूंना संपर्क करून त्यांना ‘दत्ताचा नामजप करण्याचे महत्त्व अन् मल्याळम् भाषेतील ‘दत्त’ लघुग्रंथ’, यांविषयी माहिती सांगून त्यांना ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपात सहभागी होण्यास सांगितले. दत्ताच्या सामूहिक नामजपाच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

प्रतिकात्मक छायाचित्र

१. श्री. नंदकुमार कैमल, एर्नाकुलम्, केरळ.

‘लोकांना सामूहिक नामजपाविषयी सांगण्यासाठी संपर्क करतांना मला प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व अनेक वेळा जाणवले.’

२. श्री. साईदीपक गोपीनाथ, थिरुवनंतपूरम्, केरळ.

मनात मृत मुलाविषयी विचार येत असल्याने पत्नीच्या आजींना रात्री झोप न येणे आणि दत्ताचा नामजप केल्यावर मनातील ते विचार नाहीसे होऊन त्यांना शांत झोप लागणे : ‘माझ्या पत्नीच्या (सौ. अंजना यांच्या) आजींच्या (श्रीमती जी. तंकम्मा (वय ९० वर्षे) यांच्या) मुलाचा बर्‍याच वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या मनात तेच विचार येत असल्याने त्यांना झोप लागत नसे. मी त्यांना दत्ताच्या नामजपाविषयी सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी दत्ताचा नामजप चालू केल्यावर त्यांच्या मनातील मुलाच्या मृत्यूविषयीचे विचार नाहीसे झाले. आता त्यांना रात्री शांत झोप लागते.’

३. सौ. अवनी श्रीराम लुकतुके, एर्नाकुलम्, केरळ.

‘२९.१२.२०२० या दिवशी दत्ताचा सामूहिक नामजप होता. त्या वेळी मला माझ्या डोळ्यांसमोर गुरुपादुका दिसत होत्या आणि त्यातून पुष्कळ थंड लहरी येत असल्याचे मला जाणवले.’

४. श्रीमती माया प्रमोद, पळ्ळूरुत्थी, केरळ.

‘दत्ताचा सामूहिक नामजप करत असतांना माझी डोकेदुखी आणि थकवा नाहीसा झाला. त्या वेळी मला हलकेपणा जाणवत होता आणि माझ्या आज्ञाचक्रावर संवेदना जाणवत होत्या.’

५. सौ. शालिनी सुरेश, फोर्टकोची, केरळ.

‘दत्ताच्या सामूहिक नामजपाच्या वेळी मला माझ्या आज्ञाचक्रावर पुष्कळ वेळ संवेदना जाणवत होत्या. त्या वेळी माझे मन शांत होते.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ५.२.२०२१)