गीता प्रेसच्या स्थापनेपासून ९८ वर्षांमध्ये प्रथमच धार्मिक पुस्तकांची विक्रमी विक्री !
धार्मिक माहिती जाणून घेण्याकडे हिंदूंचा वाढता ओढा !
‘देव नाही’, ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, असे म्हणणार्या साम्यवाद्यांना ही सणसणीत चपराक आहे ! – संपादक
गोरखपूर (उत्तरप्रदेश) – येथील प्रसिद्ध गीता प्रेसच्या स्थापनेनंतर ९८ वर्षांनंतर प्रथमच गेल्या ५ मासांत विक्रमी संख्येने धार्मिक पुस्तके विकली गेल्याची माहिती समोर आली आहे. विक्री गेलेल्या पुस्तकांमध्ये भगवान श्रीरामाशी संबंधित ‘रामचरित मानस’, तसेच ‘श्रीमद्भगवदगीता’ यांचे प्रमाण अधिक आहे. गीता प्रेसची धार्मिक पुस्तके प्रत्येक वर्षांला जितकी विकली जातात, त्यापेक्षा अधिक पुस्तके गेल्या ५ मासांत विकली गेली आहेत. गीता प्रेसची स्थापना वर्ष १९२३ मध्ये करण्यात आली होती. धार्मिक माहिती जाणून घेण्याकडे हिंदूंचा कल वाढला आहे.
गीता प्रेस ने तोड़े सारे रिकॉर्ड!#BhagwatGitahttps://t.co/6vbNBw3wnI
— tfipost.in (@tfipost_in) December 23, 2021
१. यावर्षी जून मासामध्ये ४ कोटी ९३ लाख रुपये, जुलैमध्ये ६ कोटी ६४ लाख रुपये, ऑगस्टमध्ये ६ कोटी ३१ लाख रुपये, सप्टेंबरमध्ये ७ कोटी ६० लाख रुपये, ऑक्टोबरमध्ये ८ कोटी ६८ लाख रुपये आणि नोव्हेंबरमध्ये ७ कोटी १५ लाख रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली.
२. गीता प्रेसच्या विश्वस्तांचे म्हणणे आहे की, पूर्वी श्रीरामजन्मभूमीच्या वादामुळे त्याच्याविषयी कुणी जाणून घेत नव्हते; मात्र आता तेथे भव्य मंदिर उभे रहात असल्याने लोक त्याविषयी अधिक माहिती घेऊ इच्छित आहेत. तसेच लोकांची धर्मावरील श्रद्धाही वाढत आहे.