भ्रष्टाचार आणि दारू विक्री यांची तक्रार करणार्या ‘माहिती अधिकार’ कार्यकर्त्याचे गुंडांनी हात अन् पाय तोडले !
|
बाडमेर (राजस्थान) – येथे काही गुंडांनी अमराराम गोदारा या ३० वर्षीय माहिती अधिकार कार्यकर्त्याचे अपहरण केल्यानंतर त्याचे हात आणि पाय तोडले. त्यानंतर त्यांच्या पायामध्ये लोखंडी सळ्या आणि खिळे ठोकण्यात आले. गोदारा यांनी ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आणि अवैध दारू विक्री यांविषयी तक्रार केली होती. त्यामुळे त्यांच्यावर हे आक्रमण करण्यात आले. अमराराम गोदारा यांच्यावर जोधपूर येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. जोधपूरहून घरी परतणारे गोदारा बसमधून उतरत असतांना मुखवटाधारी ८ गुंडांनी त्यांचे चारचाकी गाडीतून अपहरण केले होते.
Rajasthan RTI activist attacked for exposing illegal liquor trade; legs pierced with nails https://t.co/4XcEWhTaQS
— Republic (@republic) December 23, 2021